दि.वि. जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राचार्य दिनकर विष्णू जोशी उर्फ दि.वि. जोशी (२६ ऑगस्ट १९२६ - २० डिसेंबर २००५) हे विदर्भातील एक मराठी साहित्यिक व चित्रकार होते.[ संदर्भ हवा ] बालकथासंग्रह, बालनाटके, ललितबंध, कादंबऱ्या, रूपककथा संग्रह, लघुकथा संग्रह, नाटके, एकांकिका, लेखसंग्रह, हास्यकथा अशी एकूण सुमारे शंभरहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.[ संदर्भ हवा ]

दि.वि. जोशी यांनी व्यंगचित्रांद्वारे अनेक मासिकांमधून समाजात घडलेल्या घटनांना व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजदर्शन घडवले.त्यांनी जे जे स्कुल ऑफ आर्टस् चा पदवीपर्यंत चा अभ्यासक्रम पूर्ण केला परंतु वडिलांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने परीक्षा देता आली नाही. पुढे वडिलांच्या पश्चात घरची जबादारी पेलत मराठी साहित्यात एम ए करून प्राध्यापक व पुढे प्राचार्य पद सांभाळले. पुण्यात त्यांव्या चित्रांचे प्रदर्शन झाले.[ संदर्भ हवा ] सन १९४७ ते १९६० या कालावधीत उद्यम, किर्लोस्कर, मनोहर, वसंत, हंस या मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या चित्रांना प्रथम-द्वितीय-तृतीय क्रमांक मिळाले. कमीतकमी वेळात दि.वि. जोशी यांनी काढलेले व्यंगचित्र मार्मिक भाष्य करून जाई.[ संदर्भ हवा ]

पुस्तके[संपादन]

कादंबरी [ संदर्भ हवा ][संपादन]

बालकादंबरी [ संदर्भ हवा ][संपादन]

  • स्वप्नगंधा
  • उनाड राजा
  • बुमचिकि
  • राक्षस परी आणि पियूची गोष्ट
  • राजकुमार चकोर आणि राक्षस
  • सोन्याची मांजर (पारितोषिक प्राप्त)
  • चिपकचंडी (बालसाहित्य)
  • दिपकळ्या (बालसाहित्य )

नाटके [ संदर्भ हवा ][संपादन]

  • कळीचा नारद
  • रंगला डाव आता
  • प्रपंच करावा नेटका
  • हसली माझी व्यथा
  • चंद्रमे जे अलांछन
  • स्वप्नांना पंख नसतात
  • अतिथी https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5188506722606990018?BookName=Atithi
  • एक मिनीट फक्त
  • चोरीचा मामला (विनोदी नाटक)
  • नशीबवान
  • नामानिराळा
  • तेथे पाहिजे जातीचे
  • पुनःप्रत्यय
  • रस्ते
  • ही गोष्टच वेगळी

एकांकिका [ संदर्भ हवा ][संपादन]

  • पैशाला पाय फुटतात
  • प्रपंच करावा नेटका
  • ताकापुरते रामायण
  • व्हायचं तेच झालं
  • भिंतीला कान असतात
  • सारी सोंगे येतात
  • घोडं पेंड खाते
  • कथा एका मुलाची
  • राखावी बहुतांची अंतरे
  • स्वप्न एका सामान्याचे ( याचे उर्दूत भाषांतर झाले आहे.)
  • एक होता आदम
  • हेचि दान देगा
  • वशिल्याचे तट्टू
  • बराय मंडळी
  • जुलमाचा रामराम
  • आत्याबाईंना मिशा आल्या
  • एकाच माळेचे मणी
  • नकटीचे लग्न ( दूरदर्शनवर १४-१०-१९९१ रोजी प्रसारित)
  • अखेर माणूसच मेला (जातिभेद निर्मूलन : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रयोगक्षम एकांकिका)
  • दि. वि. जोशी यांच्या प्रयोगक्षम पाच एकांकिका (जेव्हा सरहद्द लढतो, हॅम्लेट वेडा नाही, हा खेळ मांडियेला, प्रतिशोध, वेंधळा)
  • रहस्यमय चकवा (दि.वि. जोशी नाट्यसंच)
  • चक्रव्यूह (प्रयोगक्षम एकांकिका)
  • घर सापडलंय (प्रयोगक्षम एकांकिका)
  • असंही घडू शकतं (प्रयोगक्षम एकांकिका)
  • आमचं काय चुकलं (ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रयोगक्षम एकांकिका)
  • द. ह. शतवादी (विनोदी एकांकिका)
  • तिसरा अंक (प्रयोगक्षम एकांकिका)
  • परिवर्तन (प्रयोगक्षम एकांकिका)
  • पाण्यावेगळी (प्रयोगक्षम एकांकिका)
  • माळवतीच्या सावल्या (प्रयोगक्षम एकांकिका)
  • स्वप्नांना पंख नसतात (एकांकिका)
  • सांजपक्षी (प्रयोगक्षम एकांकिका)
  • सेन्ससचा माणूस (प्रयोगक्षम एकांकिका)
  • वरदान यौवनाचे (प्रयोगक्षम एकांकिका)
  • मला शिकायचं आहे (प्रयोगक्षम एकांकिका

कथासंग्रह [ संदर्भ हवा ][संपादन]

  • काटशह (रहस्यमय नभोनाटय)
  • चंद्रमे जे अलांछन (कथासंग्रह)
  • डांगरवाडी (कथासंग्रह)
  • ऋचा (रूपक कथा)
  • डोंगरकूस (कादंबरी)
  • रहस्यमय आखरी डाव (गूढकथा संग्रह)
  • रहस्यमय गफलत (गूढकथा संग्रह)
  • व्यंगचित्रे : हास्य फवारे (व्यंगचित्रांचा संग्रह)
  • श्रेष्ठ भारतीय बालकथा - तमिळ

कथा व कविता[संपादन]

प्रा. दि. वि. जोशी यांच्या १०० च्या वर कथा, २५ च्या वर लघुकथा, ५० च्या वर कविता, ४० च्या वर ललित बंध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.[ संदर्भ हवा ]

इतर मानसन्मान[संपादन]

  • who's who साहित्य कला अकादमी (१९६२)[ संदर्भ हवा ]
  • विदर्भ साहित्यसंघ जिल्हास्तर साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष (१९६२)[ संदर्भ हवा ]
  • महाराष्ट्र राज्य साहित्य परीक्षण मंडळ कादंबरी नेमणूक (१९९७)[ संदर्भ हवा ]
  • यांच्या साहित्यावर एम फील व पी एच डी चे प्रबंध सादर.[ संदर्भ हवा ]
  • कै. दारव्हेकर वेळी नभोनाट्य समीक्षक (नागपूर)[ संदर्भ हवा ]
  • जळगाव नभोवाणी लोकसंगीत परीक्षक.[ संदर्भ हवा ]


संदर्भ[संपादन]