Jump to content

दंतिदुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दंतिदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्यातील महान राजा होता.तो मान्यखेटच्या राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता.हा या घराण्यातील पहिला स्वतंत्र राजा म्हणून ओळखला जातो.


दंतिदुर्ग
महासामंताधिपदी
अधिकारकाळ इ.स.७३५ ते , इ.स. ७५८
राज्यव्याप्ती महाराष्ट्र, उत्तर-दक्षिण कर्नाटक,संपुर्ण मध्यप्रदेश,दक्षिण गुजरात,माळवा,कोसल
राजधानी वेरूळ
पूर्ण नाव दंतिवरम दुसरा
जन्म , ७३५
मृत्यू ७५८
उत्तराधिकारी कृष्ण पहिला
वडील इंद्र दुसरा
आई भावनागा
चलन
राष्ट्रकूट राजे (७५३-९८२)
दंतिदुर्ग (७३५-७५६)
कृष्ण पहिला (७५६-७७४)
गोविंद दुसरा (७७४-७८०)
ध्रुव धरावर्ष (७८०-७९३)
गोविंद राष्ट्रकूट तिसरा (७९३-८१४)
अमोघवर्ष (८१४-८७८)
कृष्ण राष्ट्रकूट तिसरा (८७८-९१४)
इंद्र राष्ट्रकूट तिसरा (९१४-९२९)
अमोघवर्ष दुसरा (९२९-९३०)
गोविंद राष्ट्रकूट चौथा (९३०-९३६)
अमोघवर्ष तिसरा (९३६-९३९)
कृष्ण राष्ट्रकूट तिसरा (९३९-९६७)
खोट्टिग अमोघवर्ष (९६७-९७२)
कर्क राष्ट्रकूट दुसरा (९७२-९७३)
इंद्र राष्ट्रकूट चौथा (९७३-९८२)
तैलप दुसरा
(पश्चिम चालुक्य)
(९७३-९९७)

इतिहास

[संपादन]

दंतिदुर्ग हा चालुक्य नृपती विक्रमादित्य दुसरा याचा सामंत होता.त्याने चालुक्यांना खूप मदत केली.विक्रमादित्य दुसरा याच्या मृत्यूनंतर दंतिदुर्गाने स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला.याचाच फायदा घेऊन त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर दक्षिणेत स्वाऱ्या सुरुवात केली होती.

राज्यव्याप्ती

[संपादन]

दंतिदुर्गाने दक्षिण आणि मध्य भारतात आपला साम्राज्यविस्तार केला होता.त्याने कांची,कलिंग,श्रीहर्ष,वज्रट,कोसल,माळवा,लाट(गुर्जर-गुजरात)टंक व पश्चिम महाराष्ट्र इत्यादी प्रदेशात केला होता.त्याने सामर्थ्यशाली लष्कर निर्माण केले होते.याच्याच जोरावर त्याने केरळ,चोळ,पांड्य व कांचीच्या पल्लवांचा पराभव केला होता.इ.स.७५० मध्ये तो मध्य व दक्षिण गुजरात,संपुर्ण मध्यप्रदेश व वऱ्हाड प्रदेशाचा अधिपती बनला होता.इ.स.७५२ मध्ये खानदेश येथे झालेल्या युद्धात किर्तीवर्मन दुसरा याचा पराभव केला.इ.स.७५३ संपूर्ण महाराष्ट्र व चालुक्यांचे कर्नाटकातील राज्य दंतिदुर्गाच्या ताब्यात आले.

सैन्य

[संपादन]

त्याचे सैन्य हे आधुनिक पद्धतीने युक्त होते.त्याचे लष्कर हे सामर्थ्यशाली असून कोणत्याही युद्धासाठी तयार असत.

कार्ये

[संपादन]

दंतिदुर्ग हा कलेचा भोक्ता होता.वेरूळ येथे असलेल्या कैलास मंदिर कोरण्यास सुरुवात याच्याच काळात झाली.नंतरच्या काळात कृष्ण पहिला याने हे मंदिर पूर्णत्वास नेले.

त्याचा मृत्यू हा इ.स.७५८ मध्ये झाला.

संदर्भयादी

[संपादन]

१.Kamath, Suryanath U. (2001) [1980]. A concise history of Karnataka : from pre-historic times to the present. Bangalore: Jupiter books. LCCN 80905179. OCLC 7796041