Jump to content

डिग्रस (बीड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डिग्रस हे महाराष्ट्रतील बीड जिल्ह्यातील गाव आहे.[] हे गाव महाराष्ट्रातील कासार समाजाचे तीर्थक्षेत्र आहे कारण तिथे कासारांची कुलदेवता कालिंका देवीचे मंदिर आहे.[] कालिंका देवी यात्रेदरम्यान, देवी कालिंका आणि तिच्या चार भगिनी देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक लांबून येतात.[] तसेच डिग्रसला कासार समाजाचे माहेरघर म्हणून संबोधले जाते.

  ?डिग्रस

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: देवीचे डिग्रस
—  गाव  —
Map

१९° ०६′ ०१.३″ N, ७६° २१′ १३.८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
अंतर
मुंबई पासून
पुणे पासून
औरंगाबाद पासून

• ४५०कि.मी किमी (पूर्वेला)
• ३२२कि.मी किमी (पूर्वेला)
• १७६ किमी (दक्षिणेला)
जवळचे शहर माजलगाव (२७ किमी)
प्रांत भारत ध्वज भारत
[[ महाराष्ट्र विभाग|विभाग]] औरंगाबाद विभाग
जिल्हा बीड
लोकसंख्या १,२०८ (२०१८)
भाषा मराठी
कोड
पिन कोड

• ४३११२८

[[वर्ग: महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]

बद्दल

[संपादन]

डिग्रस हे गाव कालिंका देवी मंदिरासाठी ओळखले जाते. देवी कालिंका ही भारतातील महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने 'कासार' समाजाची देवता आहे.[]

कलिंका देवी

स्थान

[संपादन]

डिग्रस हे गाव गोदावरी नदीच्या काठी बीड जिल्ह्याच्या ईशान्य दिशेला परभणी जिल्ह्याला लागून आहे.

पर्यटन

[संपादन]

डिग्रसमध्ये कालिंका देवी, हनुमान मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र, जानकाई माता, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, खंडोबा, काकनाई इत्यादी. मंदिरे आहेत.

कालिंका देवी ही कासार समाजाची देवता असल्याने अनेक भाविक दरवर्षी कालिंका देवीच्या मंदिराला भेट देतात, विशेषतः कासार समुदायातून.

शिक्षण

[संपादन]

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डिग्रस हे गावातील एकमेव शैक्षणिक संस्था आहे जी की बीड जिल्हा परिषद द्वारे कार्यरत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुले क्रिकेट खेळताना

लोकसंख्याशास्त्र

[संपादन]

डिग्रस बीड जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने लहान गावांपैकी एक आहे. २०१८ नुसार गावात १२०३ लोक राहतात.[]

भाषा

मराठी ही अधिकृत आणि सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.[]

वाहतूक

[संपादन]

जवळचे विमानतळ - लातूर विमानतळ (१०० किमी)[]

जवळचे रेल्वेस्थानक- परळ वैजनाथ रेल्वे स्थानक (४५ किमी)[]

जवळचे राज्य परिवहन स्थानक- माजलगाव बस स्थानक (२७ किमी)

गावामध्ये राज्य परिवहन महामंडळाची सेवा उपलब्ध आहे.(३वेळा माजलगाव ते डिग्रस- दररोज)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Limited, Nigade Software Technologies (opc) Private. "दिग्रस परळी बीड महाराष्ट्र ( Digras Parli Beed Maharashtra )". www.swapp.co.in. 2022-07-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Kalinka Devi Temple". templesofindia.org (इंग्रजी भाषेत). 2022-07-07 रोजी पाहिले.
  3. ^ archana. "कालिका माता मी जय..!! |" (इंग्रजी भाषेत). 2022-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Kalinka Devi Temple". templesofindia.org (इंग्रजी भाषेत). 2022-07-07 रोजी पाहिले.
  5. ^ "Parli Population (2021/2022), Taluka Village List in Beed, Maharashtra". www.indiagrowing.com. 2023-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-07 रोजी पाहिले.
  6. ^ "Parli Population (2021/2022), Taluka Village List in Beed, Maharashtra". www.indiagrowing.com. 2023-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-07 रोजी पाहिले.
  7. ^ "लातूर विमानतळावर १० तासांत ८० उड्डाणे". Maharashtra Times. 2022-07-07 रोजी पाहिले.
  8. ^ "Parli Vaijnath Railway Station News - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2022-07-07 रोजी पाहिले.