टोकराळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?टोकराळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .२०२६७ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२३५ (२०११)
• १,१६०/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५२५
• एमएच४८

टोकराळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

केळवे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला केळवे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे वळल्यानंतर काही अंतरावर हे गाव लागते. केळवे रोड रेल्वे स्थानकापासून हे गाव ४.४ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे एक फार छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५२ कुटुंबे राहतात. एकूण २३५ लोकसंख्येपैकी १२३ पुरुष तर ११२ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.५३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७८.८५ आहे तर स्त्री साक्षरता ४९.४९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.६२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस केळवे रोड रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शा केळवे रोड रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

वरखुंटी, कमारे, हरणवाळी, वडराई, माहीम, बांदते, झांझरोळी, केळवे रोड, केळवे, मांगेलवाडा, मायखोप ही जवळपासची गावे आहेत.टोकराळे, कमारे, वरखुंटी ही गावे कमारे ग्रामपंचायतीमध्ये येतात.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/