मायखोप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?मायखोप
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 19°36′46″N 72°46′54″E / 19.6128°N 72.7816°E / 19.6128; 72.7816
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .३७४२४ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,२१७ (२०११)
• ५,९२४/किमी
भाषा मराठी
सरपंच करुणा पाटील
बोलीभाषा आदिवासी कातकरी,वाडवळी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०१
• +०२५२५
• एमएच४८

गुणक: 19°36′46″N 72°46′54″E / 19.6128°N 72.7816°E / 19.6128; 72.7816


मायखोप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

केळवे रोड रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला सफाळे मार्गाने गेल्यावर साईमंदिरानंतर हे गाव लागते. केळवे रोड रेल्वे स्थानकापासून हे गाव १.८ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५४४ कुटुंबे राहतात. एकूण २२१७ लोकसंख्येपैकी १११६ पुरुष तर ११०१ महिला आहेत. गावाची साक्षरता ८५.७१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९३.६५ आहे तर स्त्री साक्षरता ७७.६७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.७० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुध्दा ते करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस केळवे रोड रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुध्दा केळवे रोड रेल्वे स्थानकावरुन दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

बांदते, झांझरोळी, केळवे रोड, केळवे, मांगेलवाडा, रोठे, लालठाणे, गिरनोळी, सागवे, कोकणेर, चहाडे ही जवळपासची गावे आहेत.बांदते, मायखोप, रोठे, झांझरोळी ही गावे मायखोप ग्रामपंचायतीमध्ये येतात.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/