हरणवाळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हरणवाळी महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गाव आहे. हे पालघर रेल्वे स्थानकापासून ४ किमीवर वसलेले आहे.

पालघर-माहीम रस्त्यावर वागुळसार बसथांबा सोडल्यानंतर उजवीकडे जाणाऱ्या रस्ता हरणवाळीस जातो. पूर्वी येथे भरपूर उंच व गर्द गवत उगवायचे आणि ससे, भेकर, हरिण इत्यादि शाकाहारी वन्य प्राणी भरपूर प्रमाणात चरण्यासाठी यायचे व तेथेच निवारा शोधून वस्ती करायचे. हरिण प्राण्यांच्या वास्तव्यावरूनच हरिण आळी |हरणवाळी|हरणवाडी असे नाव ह्या भागास पडले.

जनजीवन[संपादन]

येथे मुख्यतः आगरी समाजातील लोकांची वस्ती आहे. लोक भरपूर कष्टाळू, मेहनती,जिद्दी, आणि धाडसी आहेत. भातशेती बरोबर बागायतीचा व्यवसाय आणि काही प्रमाणात दुग्ध उत्पादन घेतले जाते.

येथे गुजरातमधून आलेल्या भरवाड़ भटक्या जमातीचे लोक काही वर्षांपूर्वी स्थायिक झाले असून गाई,म्हशी,शेळी,बकरी पालन करून दुग्ध व्यवसाय करीत आहेत.त्यांची आजही आजूबाजूच्या भागात गुराढोरांसहित भटकंती चालू असते.

नागरी सुविधा[संपादन]

पालघरहून येथे येण्यासाठी वडराई, केळवे, सफाळे, दातिवरे,गावांकडे जाणाऱ्या एसटी बस उपलब्ध आहेत. पालघरहून हरणवाळी थेट बससेवासुद्धा आहे.सार्वजनिक पाणीपुरवठा, वीजव्यवस्था, स्वच्छता ग्रामपंचायततर्फे पाहिली जाते. माध्यमिक शिक्षण तसेच तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी ४ किमीवर असलेल्या माहीम शिक्षणसंस्थेच्या विद्यालयात जावे लागते.त्यासाठी खास बससुविधा उपलब्ध केलेली आहे.

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc