Jump to content

वर्षा भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्षा भोसले
जन्म वर्षा
इ.स. १९५६
मृत्यू ८ ऑक्टोबर, इ.स. २०१२
मृत्यूचे कारण आत्महत्या
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे अण्णा
नागरिकत्व भारतीय
पेशा पत्रकार, गायिका
धर्म हिंदू
आई आशा भोसले

वर्षा भोसले (इ.स. १९५६ - ८ ऑक्टोबर, इ.स. २०१२) या मराठी गायिका, पत्रकार होत्या. या मराठी पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या कन्या होत्या.

कारकीर्द

[संपादन]

वर्षा भोसले यांनी काही हिंदी, तसेच मराठी चित्रपटांतून पार्श्वगायन केले होते. रेडिफ या भारतीय वेबपोर्टलावर इ.स. १९९७-२००३ या काळात त्या लेखन करत. तसेच त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्लिश वृत्तपत्रातून काही काळ स्तंभ लिहिले [].

मृत्यू

[संपादन]

८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी वर्षा भोसले यांनी मुंबईतील आपल्या "प्रभुकुंज" या निवासस्थानी आत्महत्या केली. आपल्या परवानाप्राप्त रिव्हॉल्वरातून त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्याचे निष्पन्न झाले [].

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "आशाताईंच्या मुलीची गोळी झाडून आत्महत्या". ८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)