डोळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरीराचा एक अवयव. डोळा या अवयवास प्रकाशाची जाणीव होते. डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तू वर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परवार्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्या दिसते.

माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला खोलीची जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या कवटीच्या खोबणीत बसवले आहेत. त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात.

डोळ्यांचे रंग[संपादन]

डोळे काळे, निळे, घारे, हिरवे व लाल रंगाचे असू शकतात.

पुस्तके[संपादन]

डोळ्यांचे आरोग्य या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :

  • चष्मा व नेत्ररोग चिकित्सा (डॉ. जयनारायण जैस्वाल)
  • डोळ्यांची निगा (डॉ. छाया कुलकर्णी)
  • नेत्र स्वास्थ्य साधना (सदाशिव निंबाळकर)
  • पाहू आनंदे (डॉ. तेजस्विनी आणि डॉ. प्रसाद वाळिंबे)
मानवी डोळा