ऋषी
Appearance
(ऋषि या पानावरून पुनर्निर्देशित)
सत्यचेतनेच्या स्तरावर दृष्टि, श्रुति आणि विवेक कार्य करत असतात. म्हणजेच सत्याचे थेट दर्शन, सत्याचे थेट श्रवण, त्यातून काय योग्य काय अयोग्य यासंबंधी केला जाणारा विवेक या गोष्टी त्यांच्याकडे असतात. ज्याच्या ठिकाणी ही सत्यचेतना जागृत आहे आणि दृष्टि, श्रुति आणि विवेक हे कार्यरत आहेत त्याला 'ऋषि', 'कवि', 'द्रष्टा' असे म्हणतात. [१] ज्यांना श्रुति ग्रंथ यथावत समजतो अशा लोकांना ऋषी म्हणतात. रामायण-महाभारतात आणि अन्य पुराण ग्रंथांत अनेक ऋषींची नावे आली आहेत.
ऋषींचे प्रकार
[संपादन]ऋषींचे चढत्या क्रमाने सात प्रकार पडतात. राजर्षी, कांडर्षी, श्रुतर्षी, परमर्षी. देवर्षी, महर्षी आणि ब्रह्मर्षी
काही प्रसिद्ध ऋषींची नावे
[संपादन]अ पासून अ: पर्यंत अक्षरे
[संपादन]- अगस्ती
- अंगिरस
- अत्री - ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलात यांची सूक्ते आहेत.
- अथर्वण
- अयास्य (ऋषी) - ऋग्वेदामध्ये (१०-१०८-८) अयास्य ऋषींचा उल्लेख येतो. [१]
- अपयाज ऋषी - याज आणि अपयाज ऋषी राजा द्रुपदाच्या यज्ञात सहभागी होते असा उल्लेख येतो.
'क' वर्ग
[संपादन]- कपिल
- कक्षीवान
- कणाद
- कण्व
- कश्यप
- किदंब - हे महाभारतकालीन ऋषी होते. यांनी पंडू राजा यांना शाप दिला होता.
- गौतम
- गृत्समद - ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात यांची सूक्ते आहेत. यांनी बृहस्पती-सूक्त लिहिले आहे. (वेद-रहस्य: पान १५९)
- घोर - कण्व ऋषींचे पिता
'च' वर्ग
[संपादन]- जमदग्नी
- जेत्रि - हे ऋषी मधुच्छंदस् यांचे पुत्र होते. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील अकरावे सूक्त यांचे आहे. मधुच्छंदस् आणि जेत्रि यांच्या सूक्तांमधून एकूण वेदविचारातील सुसंगती चांगली स्पष्ट होते; म्हणून वेदांचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने ही सूक्ते महत्त्वाची आहेत असे श्रीअरविंद यांना वाटते.
- जैमिनी
'ट' वर्ग
[संपादन]'त' वर्ग
[संपादन]- त्वष्टा
- दीर्घतमस् औचथ्य - ऋग्वेदातील यांची सूक्ते खोल व गहन अर्थाची आहेत.[१]
- दुर्वास - यांच्या वरदानामुळे कुंतीला पुत्रप्राप्ती होते.
- धौम्य
- नारदमुनी
- नोध
'प' वर्ग
[संपादन]- पराशर शाक्त्य - ऋग्वेदामध्ये यांच्या ऋचा आहेत.
- पतंजली
- प्रियमेध
- बादरायण
- भारद्वाज - ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलात यांची सूक्ते आहेत.
- भृगू
- महाचमस्य - तैत्तरिय उपनिषदात महाचमस्य ऋषींनी चवथ्या व्याहृतीचा - महर् चा शोध लावला. (वेद-रहस्य: पान १६०)
- मरीची
- मांडव्य - हे महाभारतकालीन ऋषी होते. त्यांच्या शापामुळे यमधर्माला विदुराच्या रूपाने जन्म घ्यावा लागला असे सांगितले जाते.
- मेधातिथी कण्व - ऋग्वेदातील यांची सूक्ते स्वरमय आणि प्रवाही आहेत.
- मुद्गल - या ऋषीची कथा महाभारतात आलेली आहे. ऋषी दुर्वास यांनी त्यांना सदेह स्वर्गलोकी जाण्याचा वर दिलेला असतो.
- मौद्गल्य ऋषी - पत्नी नलायनी (हिचा पुढील जन्म म्हणजे द्रौपदी) असे सांगितले जाते.
- मधुच्छंदस् - हे ऋषी विश्वामित्रांचे पुत्र होते. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील पहिली दहा सूक्ते यांची आहेत.
य पासून ळ पर्यंत अक्षरे
[संपादन]- याज्ञवल्क्य - हे ऋषी आनंद स्थितीपर्यंत जाऊन पोहोचले होते, असे नमूद केलेले आढळते. [२]
- रुरु - भृगु ऋषींच्या वंशातील एक ऋषी. रुरु आणि प्रियंवदा यांची प्रेमकहाणी महाभारतात आली आहे.[३]
- वसिष्ठ - ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात यांची सूक्ते आहेत. ऋग्वेदातील यांच्या सूक्तांमध्ये सहजता आहे.
- वामदेव - ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलात यांची सूक्ते आहेत.
- वाल्मिकी
- विश्वामित्र
- ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलात यांची सूक्ते आहेत. त्यामध्ये सामर्थ्य आणि तेजस्विता दिसते.
- शर्कर
- सहस्त्रपाद
- साकमश्व
- सांदीपनी
- स्थूलकेशु - रुरु आणि प्रियंवदा या प्रेमकहाणीतील प्रियंवदेचे पालनकर्ते पिता.
- याज
संदर्भ
[संपादन]- ^ a b c वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम
- ^ Sri Aurobindo (2013). Hymns to the mystic Fire. THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. Vol 16. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
- ^ Sri Aurobindo (2009). Collected poems. THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. Vol 02. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.