Jump to content

दिवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रकाश देण्याचे काम करणाऱ्या मानवनिर्मित उपकरणाला दिवा असे म्हणतात.[ चित्र हवे ]

दिवे आणि संस्कृती

[संपादन]
पक्ष्याच्या आकाराचा तेलाचा दिवा
दिवाळीतील पणत्या

दिव्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. खाद्यतेल वापरून प्रकाशमान होणारा मातीची पणती हा भारतातील दिवा अधिक प्रकाश देणाऱ्या इतर साधनांच्या उपलब्धतेनंतर कमी वापरला जाऊ लागला, तरी त्याचे परंपरेतील स्थान अबाधित राहिले आहे. देवळे, देव्हारे, तुळशी वृंदावने, स्वागत कमानी आणि दरवाजांचे कोनाडे वगैरे ठिकाणी पणत्या लावल्या जातात. सायंकाळच्या वेळी दिवा लावल्यानंतर दिव्यास नमस्कार करण्याची प्रथाही आहे. तसेच महाराष्ट्रात घरोघरी सायंकाळी म्हणावयाच्या शुंभकरोति प्रार्थनेत सुद्धा दिव्याचा उल्लेख असतो. पणत्यांचा उपयोग आरती तसेच ओवाळताना सुद्धा केला जातो. त्याकरिता बऱ्याचदा पिठाच्या पणत्या वापरण्याची परंपरा आहे. ठरावीक सणाच्या दिवशी पणत्या नदी अथवा तलावात सोडण्याची प्रथा आहे. त्याशिवाय दिपावली सणाच्या वेळी पणत्या ओळीने अथवा विशिष्ट रचनेत लावून पारंपारिक रोषणाई केली जाते.

दिवाळीसाठी पणत्यांची विक्री, पुणे, महाराष्ट्र

या पणत्या सुंदर सजवून व रंगवून रचना करावी. सजवण्यासाठी वेगवेगळ्या सजावट साहित्यांचा वापर करावा. देवघर आणि मंदिरांतून पितळ, चांदी इत्यादी धातूच्या समई किंवा निरांजने वापरली जातात. अहोरात्र जळणाऱ्या समईस नंदादीप असे म्हणतात. कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी समईचे प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्याची परंपरा आहे.

दिव्यांचे प्रकार

[संपादन]