मायणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मायणी हे खटाव तालु़क्यातील गाव आहे. हे तालुक्यातील वडूजनंतरचे दुसरे मोठे शहर आहे. हे एक व्यापारी केंद्र आहे.

भौगोलिक माहिती[संपादन]

तालुका - खटाव जिल्हा - सातारा क्षेत्रफळ - ३८६० हेक्टर लोकसंख्या - १०,८७२ (२०११ च्या जनगणनेनुसार) तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मायणी या गावातून चांद नदी वाहते. या गावातून मिरज-भिगवण (प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग) व पंढरपूर-मल्हारपेठ हे दोन राज्य महामार्ग जातात. हे महामार्ग गावातल्या चांदणी चौकातून जातात.

ऐतिहासिक माहिती[संपादन]

हे गाव एेतिहासिक आहे, तसेच पर्यटन स्थळ सुद्धा आहे.

या गावामध्ये यशवंतबाबा व सिद्धनाथाची यात्रा भरते. गावात इसवी सनाच्या १३ व्या शतकात यादवकालीन राजा सिंघण याने बांधलेले हेमाडपंथी स्वरूपाचे महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. येथील मातोश्री सरुताईंचा मठ प्रसिद्ध आहे.

हे गाव सर्व सोयीयुक्त असून मध्यम स्वरूपाचे शहर आहे.

मायणी पक्षी अभयारण्य[संपादन]

हे गाव पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. गावापासून २ कि.मी. अंतरावर ब्रिटीशकालीन तलाव आहे. येथे अनेक पाणपक्षी दिसतात. तसेच स्थलांतरीत पक्षीही येतात.स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये रोहितप पक्ष्यांचे थवे हे विशेष आकर्षण असते. त्याशिवाय चक्रवाक, पट्टकदंब, हळद-कुंकू ही बदकेही आढळतात. कापशी घार, गरुड, दलदल ससाणा असे शिकारी पक्षी देखील येथे आहेत.नदी सूर्य, खंड्या, कवड्या,राखी बगळा, वंचक,चित्रबलाक असे पाणपक्षी सुद्धा आढळतात. पक्षी निरीक्षणासाठी वनविभागाने येथे दोन मनोरे उभारले आहेत. 

वैद्यकीय सेवा[संपादन]

तसेच येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा आहे.

प्रारूप प्रादेशिक विकास योजना २०१६-२०३६ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील १० मोठ्या गावांचा म्हणजेच १०,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १० गावांचा समावेश झाला आहे. त्यांमध्ये खटाव तालुक्यातील मायणी या एकमेव गावाची निवड करण्यात आली आहे.

वाहतुकीच्या सोयी[संपादन]

 • जवळचे बस स्थानक - मायणी बसस्थानक
 • जवळचे रेल्वे स्थानक - कराड
 • जवळचा विमानतळ - कराड
 • जवळचे मोठे शहर - विटा

शैक्षणिक संस्था[संपादन]

प्राथमिक शाळा -

 • जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा .
 • जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा
 • भारतमाता इंग्लिश मीडियम स्कूल
 • ब्लाॅसम स्कूल
 • हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर.

माध्यमिक शाळा -

 • भारतमाता विद्यालय
 • भारतमाता इंग्लिश मिडीयम स्कूल
 • वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला
 • अनंत इंग्लिश स्कूल.

महाविद्यालये -

 • भारतमाता ज्युनियर काॅलेज
 • कला-वाणिज्य महाविद्यालय
 • काॅलेज आॅफ फार्मसी
 • मेडिकल काॅलेज.