भोसरे (खटाव)
?भोसरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खटाव |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | निता मधने. |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भोसरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
[संपादन]भोसरे गावचे लोकांच जीवन हे प्रामुख्याने शेती वर अवलंबून आहे.भोसरे गावाचे सोयाबीन हे प्रमुख पिक आहे.शेती मध्ये सोयाबीन,घेवडा,ऊस,वाटाना,आल,गहू, ज्वारी,हरभरा,मका ही पिके घेतली जातात,शेती ही मान्सून वर अवलंबून आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवले आहे त्या मुळे शेती साठी पाणी उपयोगी येऊन गावच्या लोकांचे राहणीमान सुधारले आहे.
गावातील सार्व लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]भोसरे गावात भव्य श्री हनुमानाचे मंदिर हे चांगल्या स्थितीतील आहे राम नवमी ला भव्य यात्रा भरते तसेच महादेवाचे पुरातन मंदिर आहे. नव्याने विठ्ठललाचे मंदिर बांधले आहे,भोसरे गावाच्या चांभार की भागात श्री मारुतीचे मंदिर हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे श्रावण महिन्यातील तिसऱ्या शनिवारी यात्रा भरते. भोसरे गावात शिवशक्ती चौक व आकरा घरे ही फार पूर्वीपासून प्रचलित आहेत. भोसरे हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेला गाव आहे. सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव आहे. सर सेनापती प्रतापराव गुजर यांचा वाडा आहे वाड्याची भव्य तटबंदी आज ही चांगल्या स्थितीत आहे. भोसरे
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]भोसरे गावाच्या जवळ कोकराळे, जाखनगाव, खटाव, वशिनपूर,लोणी, वाघ वस्ती, वरुड, जायगाव, अंभेरी ही गावे आहेत तसेच भोसरे गावाच्या उत्तरेला वलखड हे बेचिराख गाव आहे हे गाव भोसरे गावाचा एक भाग आहे. तसेच चौंकिचा आंबा हा भाग भोसरे गावात येतो. सोमवारी या ठिकाणी बाजार भरतो.