लाडेगाव (खटाव)
?लाडेगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खटाव |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
लाडेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== लाडेगाव हे गांव वडुज-पुसेसावळी रोड लगत वसलेले खेडेगाव आहे, उंचीठणे गावच्या पूर्वेस, खरशिंगे गावच्या दक्षिणेस, वांझोळी गावच्या पश्चिमेस, तसेच वडगांव(जयराम स्वामी) गावच्या उत्तरेस वसलेले गाव आहे. हे गाव साधारणता दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे, गावामध्ये बहुतांश लोक मराठा समाजाचे (यादव) आडनाव असलेले बहुतांशी लोक राहतात व त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे तसेच येथील ग्रामदैवत दक्षिण मुखी काळा मारुती जागृत देवस्थान आहे.
हवामान
[संपादन]येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.