Jump to content

वाकळवाडी (खटाव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?वाकळवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर वडूज, पुसेसावळी,औंध
जिल्हा सातारा जिल्हा
लोकसंख्या ८२२ (२०११)
भाषा मराठी
सरपंच नंदकुमार तुळशीराम डोईफोडे
बोलीभाषा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 415506
• +०२१६१
• एमएच/11

वाकळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे.

वाकळवाडी हे गाव उरमोडी प्रकल्प अंतर्गत येत असून या गावांमधून कॅनॉल गेलेला आहे गावाच्या पूर्व बाजूस पूर्णपणे शेती बागायत झालेले असून पश्चिमेला पूर्णपणे शेती खरीप आहे गावाचा या प्रकल्पांतर्गत 20 टक्के शेती ओलिताखाली आलेली असून इतर शेती पाण्यापासून वंचित आहे. या गावात 95% मराठा समाज असून इतर वंजारी, गुरव, नाभिक व कासार असा समाज आहे. या गावांमध्ये पीर साहेबांची गुढीपाडव्याच्या नंतर चौथ्या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी केली जाते. गावामध्ये एकही मुस्लिम समाजाचे घर नसल्याने पीर साहेबांची सेवा करण्यासाठी बाजूच्या गावांमधून सेवक नेमले जातात व त्यांच्यामार्फत पीर साहेबांची सेवा केली जाते. या कार्यक्रमांमध्ये तमाशा कुस्त्या व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातात. वाकळवाडी येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते. गावामध्ये विठ्ठल रुक्माई मंदिर, लक्ष्मी मंदिर, पीर साहेब मंदिर, महादेव मंदिर, नागोबा मंदिर, वाकडा देवी मंदिर, वाजुमतामाता मंदिरे आहेत. या गावामध्ये गावठाण परिसरासह पंत वस्ती, जगताप वस्ती, वंजारी मळा, कदम वस्ती, शेंडे वस्ती, झिरपी जाधव मळा, माने वस्ती अशा वस्त्या अस्तित्वात आहेत. गावामध्ये इयत्ता पहिली ते सातवी अशी जिल्हा परिषद शाळा आहे. अंगणवाडी आहे. वाकड वाडी मधून इतर गावाला जोडणारे रस्ते म्हणजे वडूज- कराड रोड आणि वडूज-निमसोड रोड हे महत्त्वाचे रोड असून वाकळवाडी-गोपूज ,वाकळवाडी-पळशी, वाकळवाडी-वांजोळी, वाकळवाडी-मुसांडवाडी वाकळवाडी-शिरसवडी, वाकळवाडी-वाकळवाडी फाटा अशा रस्त्यांची सोय आहे. पळशी ते शिरसवडी हा या गावाच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता असून हा जिल्हा परिषद विभागाकडे असल्याने दुरावस्था आहे इतर सर्व रस्ते डांबरीकरण झाले असून हा रस्ता कायमच विकासापासून दुर्लक्षित राहिलेला आहे. गावामध्ये कराड वडूज रस्त्यावर पेट्रोल पंप, हॉटेल, हार्डवेअर, इरिगेशन साहित्य, खते, बियाणे, नर्सरी अशा सुविधा आहेत.

हवामान

[संपादन]

येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

[संपादन]

सामान्य

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

विठ्ठल रुक्माई मंदिर, हनुमान मंदिर

नागरी सुविधा

[संपादन]

गावात गटाची सोय, स्वच्छ पाणी, स्वच्छ रस्ते, एसटीची सोय

जवळपासची गावे

[संपादन]

पळशी, वांजोळी, शिरसवडी, गोपुज पळशी

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate