Jump to content

फलटण तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?फलटण

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१७° ५८′ ४८″ N, ७४° २५′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील फलटण
पंचायत समिती फलटण
फलटण
जिल्हा सातारा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या 73000
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२१६६
टपाल संकेतांक ४१५ ५२३
वाहन संकेतांक MH-53

फलटण हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक तालुका व शहर आहे. फलटण शब्दाची उत्पत्ती फल उत्तन (अर्थात फळबागांचा प्रदेश) अशी असावी, असे म्हणले जाते. फलटण क्षेत्रातील धुमाळवाडी आणि दक्षिण पट्ट्यातील डाळिंबे जगभरात निर्यात होतात. फलटणचा ग्रामीण भाग कृषी क्षेत्रात प्रगत असून नीरा उजवा कालवा सिंचन योजना ही तेथील कृषी क्षेत्रासाठी संजीवनी ठरला आहे..

बाणगंगा नावाची एक नदी फलटण गावातून वहाते. नदीवर एक पूल आहे. त्याच्या एका बाजूला फलटण आणि दुसऱ्या बाजूला मलठण ही गावे आहेत. नदीचे पात्र बहुतांशी कोरडे असते. पुण्याहून फलटणला जाताना आधी मलठण लागते.

फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाई. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तरी भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. यालाच रामयात्रा व रामदिवाळी आसे देखील म्हणतात .या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनलोक येतात. फलटण येथील पुरातन हेमाडपंथी जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे.

फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजे होते.

फलटण ही महानुभाव संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे.

फलटण येथील राम मंदिर आणि मुधोजी मनमोहन राजवाडा ह्या अति प्राचीन वास्तू जतन केल्या आहेत. कैक चित्रपट/दूरचित्रवाणी मालिका ह्यांचे चित्रीकरण आजही ह्या वास्तूंमध्ये होत असते. मराठी फिल्मसृष्टीत नावलौकिक मिळवणारा फलटणकरांचा "बिरोबा फिल्म्स" निर्मित "होऊ दे जरासा उशीर" नावाचा चित्रपट ऑस्करच्या जागतिक फिल्म्स फेस्टिव्हलला पाठवला गेला होता. फलटण तालुक्यात राजुरी गावामध्ये 'सांगते ऐका' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. राममंदिर येथेही चित्रपटांचे व टी व्ही मालिकांचे शूटिंग होते phaltan he sataryatil tisarya kramankache mothe shahar aahe yach barobar phaltan - baramati va phaltan - pandharpur hi lain purn zalyavar phaltan he yek junction hoil tasech phaltan - sangli hamarg dhekil prastavit aahe 2024 made phaltan la Navin ARTO office manjur zale aahe (MH 53) phaltan hi yek changli sakharechi bajarpet aahe

अन्य प्रेक्षणीय स्थळे/मंदिरे

[संपादन]
  • आबासाहेब मंदिर - हे महानुभावपंथीय मंदिर आहे. ते राजस्थानी लाल दगड वापरून सुंदर बांधकाम केलेले मंदिर पर्यटकांना आकर्षित करते.
  • ताथवडा - येथील संतोषगड पाहण्यास पर्यटक येत असतात. येथे प्रशिद्ध आश्रम शाळा आहे )
  • नागेश्वरमंदिर - हे संस्थानकालीन मंदिर असून त्याला रेखीव असे कौलारू छप्पर आहे. सागवानी लाकडावर नक्षीकाम सुरेख केलेले पहावयास मिळते. हा एक मंदिराचा उत्कृष्ट नमुना आहे
  • वाठार निंबाळकर - येथे जुना राजवाडा आहे. येथे पुरातन कालीन राम मंदिर आहे .
  • श्रीकृष्ण मंदिर - हे अत्यंत पुरातन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्टय महणजे या मंदिरात जाण्यासाठी खाली पायरया उतरून खाली जावे लागते
  • राम मंदिर - हे निंबाळकर संस्थानकालीन मंदिर असून सागवानी लाकडावर कलाकुसर नक्षीकाम अत्यंत रेखीव असे आहे. शेजारीच एकमुखी दत्त मंदिर असून तेसुद्धा सुंदर नक्षीकाम केलेले मंदिर आहे.मकर संक्रांतीला महिला राम मंदिरा मध्ये दर्शनासाठी येतात
  • तळयातील भवानी - फलटण पुणे रोडवर बस स्थानकाजवळ भवानी देवीचे मंदिर असून ते निंबाळकर घराण्याचे मंदिर म्हणून ओळखले जाते
  • तळयातील गणपती - फलटण शहराच्या मध्यभागी डेक्कन चौकापासून जवळच हे मंदिर आहे. या मंदिरात नवरात्र उत्सवाच्या वेळी फुलांची उत्कृष्ट आरास केलेली आस्ते .फलटण शहरातील महिला या दिवसात येथे मनोभावे पूजा अर्चा करतात .
  • उपळेकर महाराज मंदिर - स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ हे मंदिर असून येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात
  • सईबाई मंदिर - उपळेकर महाराज मंदिराजवळच हे मंदिर आहे
  • मालजाईमंदिर -महात्मा फुले चौकातून कोर्टाकडे जाताने हे मंदिर लागते
  • साई मंदिर - जाधववाडी येथे हे मंदिर असून येथे भाविक गर्दी करतात
  • सावतामाळी मंदिर - नाना पाटील चौकात हे मंदिर आहे. या मंदिरात नेहमी आध्यात्मिक कार्यक्रम चालतात.सावता महाराज मंदिरामध्ये इस्कॉनचा कार्यक्रम होतो
  • बाबासाहेब मंदिर - महानुभाव पंथाचे श्री चक्रपाणि प्रभू यांचे जन्मस्थान येथे आहे
  • विठ्ठल मंदिर - हे मंदिर रविवार पेठेत असून या मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परत जाताना मुक्कामासाठी थांबते.
  • शनी मंदिर - शुक्रवार पेठेत हे मंदिर असून नागपंचमीच्या दिवशी येथे यात्रा भरते फलटण परिसरतील महिला येथे नागपंचमीला येतात
  • भिवाई देवी मंदिर -फलटणपासून उत्तरेला नीरा नदीच्या काठावर हे मंदिर असून ते प्रसिद्ध आहे .
  • पद्मावती मंदिर; -पद्मावातीनगर या ठिकाणी हे मंदिर असून या ठिकाणी ठिकाणी अत्यंत शांत असा परिसर आसल्यामुळे येथे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येतात .तसेच येथील परिसरात लग्न समारंभासाठी सुद्धा हा परिसर विकसित करण्यासाठीचा प्रयत्न चालू आहे .
  • उघडा मारुती मंदिर -रविवार पेठ फलटण या ठकाणी हे मंदिर असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे
  • जलमंदिर-जलमंदिर हे फलटण मधील श्रीगणेशाच मंदिर आहे.दर चतुर्थीला येथे कार्यक्रम होतो गणपतीची आरती होते
  • फलटण मध्ये दर रविवारी भाजीमंडई बाजार भरतो ‍‍‍‍. ‍‌आठवडी बाजार भरतो. तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी ताजी मंडई भरते. शंकर मार्केट व महात्मा फुले भाजी मंडई येथे तसेच नागेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी शिवाजी चौक या ठिकाणी सुद्धा भाजी मंडइई भरते.

फलटण तालुक्यातील कारखाने:- १.कमिन्स इंडिया लिमिटेड, सुरवडी. २.गोविंद दूध प्रकल्प, कोळकी. ३.निंबकर सीड्स व संशोधन संस्था, वडजल. ४. न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी. ५.श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण. ६.साखरवाडी या गावात चोकलेटचा कारखाना आहे. ७.स्वराज दूध प्रकल्प, निंभोरे. ८.शरयू सहकारी साखर कारखाना कापशी ९.हेरीटेज मिल्क कंपनी, सांगवी (माळवाडी) १०.राजमाता मिल्क धूळदेव. ११.संतकृपा दुध अलजापूर. १२.किसान अग्रो पशु खाद्य फरांदवाडी फलटण १२.साईराज मिल्क फरांदवाडी १३.श्रीनाथ अग्रो प्रोसेसिंग फारांदेवाडी १४अक्षता मिनरल वाटर तावडी फाटा वाठारमळा १५.मंगल मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट नवामळा ठाकुरकी ‍‍‍‍‍‍


फलटण शहरातील पेठा :-

१.सोमवार पेठ : दर वर्षी वैशाख पौर्णिमेला येथे फिरंगाई देवीची जत्रा असते. येथे महादेव मंदिर असून येथील लोक शिव भक्त आहेत पूर्वी या पेठेला माकडंमाल म्हणत असत सोमवार पेठ तालीम मंडळ येथे आहे .येथे रामकृष्ण हॉल आहे .

२.मंगळवार पेठ : येथे दर वर्षी अक्षय्य तृतीयेला नाथाच्या काठीचा उत्सव असतो.येथे जैन मंदिर असून ते संगमरवर दगडापासून बनवलेले आहे आणि येथे एक बौद्ध विहार आहे.

३.बुधवार पेठ :येथे स्वामी समर्थ मंदिर आहे

४.शुक्रवार पेठ- येथे एक तालीम मंडळ आहे ते शुक्रवार तालीम मंडळ या नावाने ओळखली जाते.

५.रविवारपेठ—येथे एक तालीम मंडळ आहे ते रविवार पेठ तालीम मंडळ या नावाने ओळखली जाते.उघडा मारुती मंदिर येथे आहे.

अन्य पेठा

[संपादन]
  1. अक्षतनगर
  2. आदर्की : येथे दर वर्षी सामूहिक विवाह सोहळा असतो.
  3. आंदरूड
  4. आसू पवारवाडी
  5. कापशी हे गाव आर्ट ऑफ लिविंग ने गाव दत्तक घेतले आहे
  6. कांबळेश्वर येथे भिवाईदेवी मंदिर प्रसिद्ध आहे .
  7. काळज येथे दत्त मंदिर आहे
  8. कोळकी-फलटण दहिवडी रोड कोळकीमधून जातो.अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे आहे.शिलादेवी शाळा आहे.
  9. खडकी
  10. गिरवी -माजी आमदार चिमणराव कदम हे या गावाचे होते
  11. घाडगेवाडी-येथे महादेवाचे मोठे मंदिर आहे.नवीन कॅनन आला आहे.शेतीसाठी पाणी या भागातनेण्यात आले
  12. चौधरवाडी- माजी आमदार चिमणराव कदम यांचे समर्थक धनसिंगराव भोसले यांचे गाव
  13. जाधववाडी
  14. झिरपवाडी
  15. जिंती-
  16. ठाकुर्की-
  17. ढवळ
  18. तरडगाव - आमदार दीपक चव्हाण हे या गावाचे आहेत
  19. तावडी - दिंडी क्र ७४ कदम महाराज तावडीकर
  20. दुधेबावी-
  21. नरसोबानगर- नरसोबा हे पूर्वी शंकराचे मंदिर होते. जीर्ण रूपात अजून ते नरसोबानगरमध्ये आहे. अनंत मंगल कार्यालय हे नरसोबानगरात आहे.कृष्णाजन्माष्टमिला दहीहंडी उत्सव असतो
  22. निंभोरे- निंभोरे गावातील बुद्ध विहारात बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी जपून ठेवल्या आहेत. दर 6 डिसेंबरला अस्थीदर्शनासाठी हजारो अनुयायी गावास भेट देतात.
  23. निंबळक-निमजाई मंदिर आहे
  24. पद्मावतीनगर- पद्मावातीनगरमध्ये पद्मावती देवीचे मंदिर आहे.
  25. पाडेगाव
  26. फरांदवाडी-बचत गटाची धन्य ग्रेडिंग उनीत सुरू आहे
  27. बिरोबानगर- पिठोरी अमावास्येला येथे मोठी यात्रा भरते. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवरून ‍‍‍‍पाणी आणून बारा तासात, रात्री बारा ते दुपारी बारापर्यंत बिरोबा देवास अंघोळ घालत.
  28. बीबी- येथे मारुतीचे मंदिर आहे. येथे कुत्रा चावल्यानंतर विडा खाण्यासाठी दिला जातो.
  29. भडकमकरनगर- येथे राजलक्ष्मी लाॅन्स मंगल कार्यालय आहे. पिरामिड चौकातून भडकमनगरला रस्ता जातो. येथे जलतरण तलाव आहे
  30. मठाचीवडी - येथील तातामगीरी मठ प्रसिद्ध आहे तसेच मठाचीवडी ही एक samart ग्रामपंचायत आहे
  31. मलठण- येथे हरिबुवा मंदिर आहे.
  32. मांडवखडक
  33. माळवाडी
  34. मिरगाव-
  35. मुरूम
  36. लक्ष्मीनगर
  37. वडगाव
  38. वडजल-पांडुरंग प्रसाद आश्रम आहे
  39. वाखरी-
  40. वाठार-राम मंदिर,पुरातनकालीन राजवाडा आहे
  41. विठ्ठलवाडी
  42. विडणी- या गावात उत्तरेश्वराचे मंदिर आहे.ग्रीनहाउस साठी प्रसिद्द आहे
  43. विद्यानगर
  44. शिंदेवाडी
  45. श्रीरामनगर
  46. संगमवाडी
  47. सरडे
  48. सांगवी माळवाडी-सांगवी मधून नीरा नदी वाहते
  49. साखरवाडी-येथे साखर कारखाना आहे
  50. सालपे
  51. सासवड
  52. सुरवडी-या गावामध्ये कमिन्स ही कंपनी आहे
  53. सोमंठली
  54. सस्तेवाडी
  55. हनुमाननगर
  56. हिंगणगाव
  57. कुरवली माळवाडी येथे बाणगंगा नदीवर धरण बांधले आहे, व त्याचे नाव बाणगंगा धरण असे आहे
  58. उपळवे-येथे एक छोटेधारण आहे. नव्यानेच इथे लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना चालू झाला आहे.

५७ .वेळोशी- फलटणचे दक्षिण टोक. श्रेयस कांबळे यांचे गाव.

मनोरंजनाची ठिकाणे :-


१.आदितीराजे गार्डन लक्ष्मी नगर येथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी विविध खेळणी आहेत

२.इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे नाटक स्नेहसंमेलन सभा परिसंवाद होतात

३.जलतरण तलाव भडकमकर नगर

४.जलतरण तलाव सोमवार पेठ फलटण

५.विमानतळावरील नक्षत्र पार्क

६.नामवैभव (सिटी प्राईड)चित्रपटगृह.

७.नाना-नानी पार्क

८.विमानतळावर खूप लोक फिरायला जातात.

९.रामराजे वाटरपार्क (सस्तेवाडी)

१०.धबधबा (धुमाळवाडी)

फलटण तालुक्यातली गावे

[संपादन]

मांडवखडक-येथे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. डिसेंबर महिन्यात येथे हरिनाम सप्ताह असतो.

ढवळ - हे गाव पैलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते. सातारा जिल्ह्याला पहिला मानाचा महाराष्ट्र केसरीचा किताब श्री बापूसाहेब लोखंडे यांनी मिळवून दिला.

"गोखळी "- फलटण तालुक्यातील हे तालुक्याच्या पूर्वेकडील असणारे प्रसिद्ध गाव. नीरा नदीच्या किनारी वसलेले व दक्षिण मुखी हनुमान मंदिरासाठी प्रसिद्ध. चैत्र महिन्यामधील हनुमान यात्रेमध्ये बारा गाड्यांसाठी प्रसिद्ध.भाजी मंडई तरकारी साठी प्रसिद्ध. गावची लोकसंख्या 4000 हून जास्त असून गावाचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. पूर्वेकडील पंचक्रोशी मधील प्रसिद्ध गाव ज्या ठिकाणी सर्व वस्तूंच्या बाजारपेठा आहेत. गिरवी-हे द्राक्षे आणि डाळिंबांसाठी प्रसिद्ध आहे.हे गाव माजी आमदार मा.चिमणराव कदम यांचे गाव म्हणून ओळखले जाते या गावात कदम,जाधव, सस्ते निकाळजे अशा नावांची लोक राहतात.या गावात एक माध्यमिक विद्यालय व ज्यू. कॉलेज आहे .तसेच एक कृषी विद्यालय आहे. या गावात अध्यापक विद्यालय सुद्धा आहे.तसेच या गावात ग्रामीण आरोग्य केंद्र आहे.या केंद्र मार्फत वाठार ,फारांवादडी व इ.उपकेंद्राना या मार्फत सेवा पुरवल्या जातात.

राजाळे- येथे जनाईदेवी मंदिर आहे ते निंबाळकरांचे कुलदैवत आहे. येथे नायटा आल्यावर देवीची मिठाने व पिठाने ओटी भरल्यास नायटा जातो अशी समजूत आहे.

हिंगणगाव-हे भैरवनाथाचे गाव आहे.हिंगणगाव हे भोईटे यांचे गाव म्हणून ओळखले जाते.

आदर्की, आसू,उपळवे, कापशी, गोखळी, ठाकुर्की, ढवळ, तरडगाव, तरडफ, दालवडी, निंभोरे, पवारवाडी, पाडेगाव, फरांदवाडी, बरड, पिंप्रद, भीमनगर, मिरगाव, राजाळे, वाखरी, वाठार निंबाळकर, विडणी, साखरवाडी, सांगवी, सासवड, सोनगाव, हिंगणगाव, सांगावी माळवाडी, सोमंथली राजाळे येथे निंबाळकर संस्थानाचे कुलदैवत जनाईदेवी मंदिर आहे.

निंबळक , पवारवाडी शाळा, निंबळक नाका, राजुरी, सोनावडी,

पिंप्रद'- या गावातील पवारवाडी येथे महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती मध्यवर्ती केंद्र आहे.दारूचे व्यसन सोडण्याचे औषध दिले जाते.तसेच राजीवजी दीक्षित गुरुकुल निवासी आश्रम शाळा आहे. ही निवासी शाळा फक्त मुलांसाठी आहे. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण येथे आहे.आध्यात्मिक शिक्षणही मुलांना दिले जाते. तबला, टाळ, मृदुंग, शिकवले जाते.भजन कीर्तन अभंग शिकवले जातात. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या काळातील खेळ दांडपट्टा, काठीलाठी, भालाफेक,विटीदांडू इ.खेळ शिकवले जातात.कराड,रहिमतपूर,आळंदी,सोल्स्पूर जिल्हा ताठीकानाहून मुल शाळेसाठी याठिकाणी येतात.या गावात मरिमाता देवीची यात्रा भरते.टी मराठी चैत्र महिन्यात असते.संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा दुपारी पिंप्रद येथे थोडावेळ विसावतो.

विडणी-विडणी हे गाव वांग्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात उत्तरेश्वर मंदिर फार वर्षांपासून आहे. तेथे उत्तरेश्वर यात्रा भरते.गावात उतरेश्वर हायस्कूल आहे. या गावात सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते येथे भाजीपाल्याच्या नर्सरी जास्त आहेत.

वाजेगाव- हे गाव पाटण तालुक्यातील पुनर्वसित गाव आहे. ते फलटण तालुक्यात वाजेगाव या ठिकाणी वसले. वाजुबाई देवी हे या गावाचे ग्रामदैवत आहे.-येथे

बाणगंगा नदीवर एक बाणगंगा धरण बांधलेले आहे या धरणाच्या पाण्यावर ठाकुर्की, फरांदवाडी, वाठार, कुरवली, माळवाडी, दालववडी या गावांतील शेतकरी शेती करतात.

बीबी- येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे व कुत्रे चावल्यावर येथे फुटाणे खाण्यासाठी लोक शनिवारी जातात.

ताथवडा- येथे शिवकालीन संतोषगड प्रसिद्ध आहे. येथून जवळच बाणगंगा धरण असून हा परिसर हिवाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो.

धुमाळवाडी -गिरवी येथून जवळच डोंगराजवळ धबधबा आहे. स्थानिक व आजूबाजूच्या तालुक्यांतील बरेच पर्यटक या ठिकाणी धबधबा पाहण्यासाठी गर्दी करतात.

सुरवडी - हे गाव फलटण तालुक्यात आहे. कमिन्स कंपनी येथे आहे. तसेच या ठिकाणचे हॉटेल निसर्ग प्रसिद्ध आहे. तसेच रॉयल गार्डन मंगल कार्यालय आहे. इन्स हॉटेल सुद्धा प्रसिद्ध आहे .

निंभोरे -हे गाव फलटण तालुक्यात आहे. या ठिकाणी माळी जातीचे लोक जास्त प्रमाणात आहेत. या गावात झांज पथक आहे.

साखरवाडी -हे गाव फलटण तालुक्यातील आहे. न्यू फलटण शुगर वर्क्स हा साखर कारखाना येथे आहे. तसेच चॉकलेटचा कारखाना आहे.

जिंती-हे गाव फलटण तालुक्यातील असून येथे रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल आहे.

निंबळक-हे गाव फलटण तालुक्यातील आहे.निमजाई देवीचे मंदिर गावात आहे.निंबळक येथे राजवाडे आहेत.सईबाई नाईकनिंबाळकर यांचे मूळ गाव निंबळकच आहे.त्यांचे वंशज नाईकनिंबाळकर हे अजूनही या गावात स्थायिक आहेत. निमजाई देवी ही नाईकनिंबाळकर घराण्याची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे.

माळवाडी -माळवाडी हे गाव फलटणच्या दक्षिणेस असून या गावात बाणगंगा नदीवर एक धरण बांधलेले असून यास बाणगंगा धरण असे नाव दिले असून या धरणामुळे ठाकुर्की , फारांदवाडी वाठार या गावातील शेतीला पाणी पुरवठा केला जातो तसेच दालवडी माळवाडी या गावातील व आसपासच्या गावांनासुद्धा या धरणाच्या पाण्याचा शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी उपयोग होतो

           मुंजवडी  -हे गाव फलटण तालुक्यातील आहे या गावात महादेवाचे (खोलेश्वर)हे मंदिर आहे़ ़़हे मंदिर पुरातन आहे़ हे देवस्थान जागुत देवस्थान आहे या गावात शेगर(राजपूत)जातीचे लोकं जास्त प्रमाणात आहेत या गावाचे ठणके पाटील हे वतनदार आहेत या गावाला पुवी लोक पाच पोरांची मुंजवडी असे म्हणत होते 

जावली - हे फलटण तालुक्यातील गाव आहे. येथे सिद्धनाथ देवाचे मंदिर आहे .सिद्धनाथाची यात्रा मोठ्या उत्साहित केली जाते व अनेक ठिकाणहून भक्त मुक्कामी येतात गावामध्ये धबधबा आहे अनेक पर्यटन स्थळाला भेट देतात

बरड - हे फलटण तालुक्यातील गाव आहे. येथे मार्केट यार्ड आहे.बरड मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा विसावतो.

निंबळकनाका -हे फलटण तालुक्यातील गाव आहे.

वाजेगाव -येथे वाजूबाई देवीचे मंदिर आहे. हे गाव फलटण पंढरपूर रस्त्यावर आहे.हे गाव पूर्वी पाटण तालुक्यात होते.पुनर्वसन म्हणून ते सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात वसले.

सरडे-हे फलटण तालुक्यातील गाव आहे. या गावात आण्णभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते.

वाखरी -हे फलटण तालुक्यातील गाव आहे. येथे फलटणचे उप मार्केट यार्ड आहे या ठिकाणी आठवडी बाजार भरतो.या गावात श्रीराम एजुकेशन सोसायटीचे हायस्कूल आहे .या गावात शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

राजुरी -या गावात सांगते ऐका या चित्रपटाचे शुटींग झाले

उपळवे - येथे साखर कारखाना आहे.फलटण तालुक्यातील बरयाच शेतकरयांचे उस या कारखान्यात नेले जातात.

फलटण तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्ती

२.प्राचार्य शिवाजीराव भोसले

१.श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर,(सभापती महाराष्ट्र राज्य )

२.वेणूताई यशवंतराव चव्हाण.‍मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी

३.लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर.(माजी खासदार शिवसेना )

४.संजीवराजे नाईक निंबाळकर (सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष )

५.रणजितसिंह नाईक निंबाळकर ( खाजदार - माढा मतदार संघ ) ६.काशिनाथ शेवते ( प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष ) ७.पी.जी. शिंदे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन) होते)

८.मालोजीराजे नाईक निंबाळकर

९.मुधोजीराजे नाईक निंबाळकर राजे फलटण संस्थान ) १०.बॅरिस्टर राजाभाऊ भोसले

११.अभिनेता सयाजी शिंदे (मराठी चित्रपट )

१२.राम निंबाळकर उद्योजक कॉन्ट्रॅक्टर

१३.विजयराव बोरावके (ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस)

१४.चिमणराव कदम ( माजी आमदार राष्ट्रीय काँग्रेस फलटण मतदारसंघ)

१५.कृष्णचंद्र भोईटे (माजी आमदार फलटण मतदारसंघ )

१६.श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर (संस्थानिक, फलटण संस्थान)

१७. सुरेश पां शिंदे (ज्येष्ठ कादंबरीकार सर्ज्या ,मेंढका , लोकजागरणाची नवी दिशा , साखरशाळा,मुडा ,सावताई ,सावंतांजली ,ग्रामिण साहित्य समीक्षा इत्यादी पुस्तकांचे लेखन )


वाहतूक

[संपादन]

फलटण हे साताऱ्यापासून सुमारे ६५ कि.मी. तर पुण्यापासून सुमारे ११० कि.मी दूर आहे.

पुण्याहून सासवड - जेजुरी - निरा - लोणंद या मार्गे तसेच साताऱ्याहून वडूथ - वाठार(रेल्वे स्थानक)- आदर्की या मार्गे फलटणला बसने जाता येते.फलटण -दहिवडी -गोंदवले -म्हसवड सांगली या ठिकाणी बस सेवा आहेत .फलटण पुसेगाव - वडूज व फलटण बारामती या ठिकाणी दर १५.मिनिटाला बस आहेत.

फलटणला जाण्यासाठी वरील दोन्ही ठिकाणांवरून राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची चांगली सोय आहे. पंढरपूरला जाणाऱ्या बसेस फलटणहून जातात.सोलापूर -तुळजापूर या ठकाणी सुद्धा बसेस आहेत.

फलटण ते लोणंद रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला आहे. त्या मुळे फलटणहून रेल्वेने लोणंदला व तेथून पुणे किवा सातारा कोल्हापूरला जाता येते.फलटण रेल्वेमार्ग पुढे पंढरपूरला जोडणार आहेत.

वैशिष्ट्ये :-

१) विमाने उतरण्यासाठी फलटणला एक धावपट्टी आहे. तिच्यावर छोटे विमान उतरू शकते. या शहराच्या बाजूला धुमाळवाडी येथे धबधबा आहे.विमानतळावर वनविभागाने एक नक्षत्र पार्क सुरू केले आहे.विमानतळाच्या जवळ सजाई गार्डन मंगल कार्यालय आहे.

२.छत्रपती शंभुराजेच्या मातोश्री श्रीमंत महाराणी सईबाई साहेब यांचं जन्मस्थान.

३.संत ज्ञानेश्वरमहाराज यांचा पालखीसोहळा लोणंद मार्गे फलटणहून पंढरपूरला रवाना होतो.तो एक मुक्कामी फलटण या ठिकाणी विमानतळावर असतो.

४फलटण हा भौगोलिक दृष्ट्या पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.

५. फलटणमध्ये उपळेकर मंदिर, सावतामहाराज मंदिर,जलमंदिर आहेत. मालजाई मंदिर,जबरेश्वर मंदिर, भवानी माता मंदिर सदगुरू हरीबुवा मंदिर फलटणला आहे.

६ वेणूताई चव्हाण या फलटण येथील होत्या.त्यांच्या नावाने फलटण येथे वेणूताई चव्हाण हायस्कूल आहे .

८. फलटण येथून जवळच सांगवी येथे रामायण काळात हनुमानच वास्तव होत असा रामायणात उल्लेख आहे.

९. फलटण येथूनजवळच धुमाळवाडी येथे पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

१०. इतिहासकालीन राममंदिर येथे असून ते लाकडी व कलाकुसरीचा अप्रतिम नमुना असून आजही अद्यावत स्थितीत आहे.

११. पुरातन कालीन दगडी मंदिर आहे ते जब्रेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते.

१२. सजाई, महाराजा, अनंत मंगल कार्यालय,आशीर्वाद मंगल कार्यालय ,सिद्धीविनायक मंगल कार्यालय येथे आहे.

१३ .महानुभाव पंथीयांची दक्षिणकशी म्हणून फलटण प्रसिद्ध आहे.

१४ .फलटण हे एक संस्थान होते व पहिल्यांदा ते स्वंतत्र भारतात विलीन झाले.

१५. जिजाई व आशीर्वाद आणि मोरेश्व मंगल कार्यालय फरांदवाडी व अक्षता मंगल कार्यालय तावडी फाटा येथे आहे.

१६. निंभोरे येथे व्यसनमुक्ती केंद्र आहे.

१७.लोणंद ते फलटण रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून लौकरच डेमू रेल्वे या मार्गावर धावणार आहे. ही रेल्वे तरडगाव व सुरवाडी या स्थानकांवर थांबणारआहे.फलटण ते लोणंद व लोणंद ते फलटण रेल्वे सप्टेंबर २०१९ पासून सुरू झाली आहे.

१८ पिंप्रद या गावात व्यसनमुक्ती केंद्र आहे

२० वडजल - या गावात पांडुरंग आश्रम असून येथे वारकरी संप्रदायाची मुले शिक्षण घेतात.व भजन व कीर्तनातून समाज प्रबोधन करतात.या आश्रमातील एक मुलगी खूप चांगले कीर्तन करते २१ महाकाली मंदिर-वाठार स्टेशन येथील फौजी धाब्याजवळ पूर्वेला हे मंदिर आहे .

२१ श्रीराम बझार प्रसिद्ध आहे .अक्षता मंगल कार्यालय तावडी फाटा वाठारमळा फलटण .

२२ नवलबाई मंगल कार्यालय मारवाड पेठ फलटण येथे आहे .

२३ राधिका मंगल कार्यालय सोमंथळी येथे आहे .

२४ गगनगिरी मंगल कार्यालय पिंप्रद येथे आहे .

२५ फलटण मध्ये देवदीपावलीला राम यात्रा भरते,व मोठी बाजारपेठ भरते

२६ यशवंत लॉन्स मंगल कार्यालय सोमंथळी येथे आहे.

२७ स्वराज दुध सोमंथळी येथे आहे.

२८ गोविंद दुध अत्यंत प्रसिद्ध आहे गोविंदचे पनीर, तूप, आस्क्रीम, लस्सी ,व खीर प्रसिद्ध आहे.

२९ फलटणला महानुभावाची दक्षिण कशी म्हणून ओळखले जाते.

३० फलटण येथे राजस्थानी लाल दगडातून बांधलेले सुंदर बांधकाम केलेले आबासाहेब मंदिर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]

निंबकर अग्रिकलचर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. येथे गोट फार्म आहे.बी.वी निंबकर यांनी १९९३ मध्ये ऑस्ट्रेलिया येथुन बोअर जातीचे एम्र्बिओ आणले होते.यांच्या जुळ्यांचे जन्मदर जास्त आहे व वर्षातून दोन वेळा पिल्लांना जन्म देते.फार्मचे प्रबंधन कसे करावे,शेळी आणि मेंढीची निगा कशी घ्यायला हवी या बाबतीत येथे प्रशिक्षण ही दिले जाते. ,[१] Archived 2007-05-31 at the Wayback Machine.तसेच येथे निंबकर सीड्स कंपनी आहे येथे वेगवेगळ्या पिकांचे बियाणे बनवतात.निर्सग हॉटेल मध्ये जेवण मस्त व शाकाहारी मिळते.

सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका