सांता रोसा दे कोपान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांता रोसा दे कोपान होन्डुरासच्या कोपान प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. २०१५मध्ये अंदाजे ४२,८०३ वस्ती असलेल्या या शहराच्या ठिकाणी इ.स. १७५०पासून वस्ती आहे. याला १२ एप्रिल, इ.स. १८४३ रोजी शहराचा दर्जा देण्यात आला.

डोंगराळ प्रदेशात असलेले हे शहर समुद्रसपाटीपासून १,१५० मीटर उंचीवर आहे.