केदारनाथ मंदिर
केदारनाथ मंदिर | |
![]() | |
नाव: | केदारनाथ मंदिर |
---|---|
निर्माता: | स्वयंभू |
जीर्णोद्धारक: | |
निर्माण काल : | अति प्राचीन |
देवता: | भगवान शंकर |
वास्तुकला: | हिन्दू |
स्थान: | उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये |
पंचकेदार |
---|
![]() |
![]() ![]() |
![]() |
केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम[१] ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर (८.७ मैल) लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.
हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मुर्ती उखीमठ ह्या स्थानवर आणल्या जातात व तेथेच पुजल्या जातात.
२०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले. परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोचला नाही.
हे सुद्धा पहा[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]