मंदाकिनी नदी
Appearance
मंदाकिनी | |
---|---|
मंदाकिनीचे गुप्तकाशी येथील पात्र | |
उगम | केदारनाथ |
मुख | रुद्रप्रयाग, उत्तराखंड |
पाणलोट क्षेत्रामधील देश | उत्तराखंड |
ह्या नदीस मिळते | अलकनंदा नदी |
मंदाकिनी ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदी व अलकनंदाची उपनदी आहे. मंदाकिनी उत्तरखंडच्या उत्तर भागात केदारनाथजवळील एक पर्वतशिखरामध्ये उगम पावते. ती रुद्रप्रयाग येथे अलकनंदेला मिळते. पुढे अलकनंदा व भागीरथी ह्या नद्यांचा देवप्रयाग येथे संगम होऊन गंगेची सुरुवात होते.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ मंदिर मंदाकिनीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत