केतू (ज्योतिष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
केतू (ज्योतिष)
BritishmuseumKetu.JPG
केतू
मराठी केतू
लोक असुर
वाहन गरुड
पत्नी चित्रलेखा

केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजीत Cauda Draconis, or Dragon's Tail or Catabibazon - ʊ ) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या छेदन बिंदूपाशी दक्षिणेस असते तो बिंदू केतू होय.

केतू सूर्याभोवती इतर ग्रहांच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.[ संदर्भ हवा ] (संदर्भाची गरज नाही!!) केतू हा पृथ्वीच्या भ्रमणमार्गावरील एक बिंदू आहे. त्या बिंदूला सूर्यप्रदक्षिणा करण्यास १८ वर्षे ७ महिने २ दिवस इतका काळ लागतो. पृथ्वीला फक्त एक वर्ष. म्हणजे पृथ्वीच्या दृष्टीने केतू जवळजवळ स्थिर आहे. जेव्हा पृथ्वी सरकत सरकत केतूजवळ येते तेव्हा पृथ्वीवरून पाहाताना केतू मागेमागे येताना दिसेल. जेव्हा पृथ्वी त्याला ओलांडून पुढे जाईल, तेव्हाही तो मागेमागे पडताना भासेल. म्हणजेच तो सदैव वक्री असेल. साधारण तर्काने हे समजायला हरकत नाही. तॆव्हा त्यासाठी संदर्भाची गरज नाही.

जेव्हा केतू (किंवा राहू) बिंदूपाशी सूर्य किंवा चंद्र येतो तेव्हा सूर्य/चंद्र ग्रहण होते. जनसामान्यांच्या भाषेत त्यावेळी सूर्याला किंवा चंद्राला राहू/केतूने गिळलेले असते. ग्रहण केव्हा होते हे समजावून सांगण्यासाठी याहून सोपे स्पष्टीकरण असू शकत नाही.

भारतीय फलज्योतिषात केतूला ग्रह मानले आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

 • अनुकूल भाव :-१२,९
 • प्रतिकूल भाव :- ७
 • बाधस्थान
 • अनुकूल राशी-धनु, मीन
 • प्रतिकूल राशी :- मिथुन, कन्या
 • मित्र ग्रह :- गुरू
 • सम ग्रह :- गुरू
 • नवीन ग्रहाशी
 • मूल त्रिकोण :- धनु
 • स्वराशीचे अंश
 • उंच्च राशी :- धनु
 • नीच राशी :- मिथुन
 • मध्यम गती
 • संख्या
 • देवता
 • अधिकार
 • दर्शकत्व
 • शरीर वर्ण
 • शरीरांगर्गत धातू
 • तत्त्व
 • कर्मेंद्रिय
 • ज्ञानेंद्रिय
 • त्रिदोषांपैकी दोष
 • त्रिगुणापैकी गुण
 • लिंग :-स्त्री
 • रंग
 • द्र्व्य
 • निवासस्थान :- घरातील कोपरा, कीटक
 • दिशा
 • जाती
 • रत्न :- लसण्या (Cat's Eye)
 • रस
 • ऋतू
 • वय
 • दृष्टी :-७
 • उदय
 • स्थलकारकत्व
 • भाग्योदय वर्ष


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.