मिथुन रास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिथुन राशीचे चिन्ह

मिथुन ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी तिसरी रास आहे. मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्वाची रास आहे. कुंडलीतील ३ क्रमांकाने दर्शवतात.

स्वभाव[संपादन]

या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गुण या राशीत आढळतात.