कर्क रास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कर्क राशीचे चिन्ह

कर्क (इंग्रजीत Cancer) ही मेेष राशीपासून आरंभ होणाऱ्या राशीचक्रातील १२ राशींपैकी चौथी रास आहे. पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्य व आश्लेषा ही नक्षत्रे मिळून ही रास बनते. सूर्य १५ जुलैच्या आसपास कर्क राशीत प्रवेश करतो आणि १५ ऑगस्टच्या आसपास ही रास सोडून सिंह राशीच्या मघा नक्षत्रात प्रवेश करतो.

आकाशात दिसणाऱ्या कर्क राशीत चार प्रमुख तारे आहेत, आणि त्यांपैकी फक्त दोन ठळक. कर्क राशीच्या पूर्वेला सिंह व पश्चिमेला मिथुन या राशी आणि उत्तरेला काकुली, ईशान्येला लघुसिंह व नैर्ऋत्येला लघुलुब्धक नावाचे तारकापुंज येतात.

हिंदू फलज्योतिषानुसार[संपादन]

कर्क राशीवर चंद्र ग्रहाची मालकी आहे. ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्रकिनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते.

साधारणपणे कर्क रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक.

कर्क राशी घेऊन जन्मलेल्या मुलाच्या नावाचे आद्याक्षर ही, हू, हे, दा, दि, दे किंवा दो असावे असा संकेत आहे.