भाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एच. हॉल या चित्रकाराने इ.स. १८२६ साली रेखलेले भालाधारी मराठा घोडेस्वाराचे रेखाचित्र

भाला हे लांब दांडीचे शस्त्र आहे. सहसा यात बांबूपासून किंवा लाकडापासून बनवलेल्या लांबलचक दांडीवर धातूचे पाते बसवले असते. युद्धात शत्रूवर चाल करून जाऊन भोसकण्यासाठी किंवा काही वेळा शत्रूवर दूर अंतरावरून फेकून मारा करण्यासाठी हा वापरला जाई. घोडदळाच्या वापरातील भाले पायदळाच्या भाल्यांपेक्षा वजनास भारी व अधिक पल्लेदार दांड्यांचे बनवलेले असतात.

रचना[संपादन]

भाल्याची दांडी सहसा बांबूपासून बनवलेली असते. त्याच्या एका टोकास धातूचे, एकसुळी किंवा अनेक सुळांमध्ये विभागलेले पाते बसवलेले असते. पात्याचा आकार निमुळता व लांबट त्रिकोणी असतो. लोखंड, पोलाद यांपासून ही पाती बनवली असतात.

मराठा घोडदळाच्या भाले सहसा १२ ते १८ फूट लांबीचे असत[१].

हेही पहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "युनिक कलेक्शन ऑफ ॲंटीक आर्म्स ॲट भोपाल म्यूझियम (भोपाळ संग्रहालयात पुरातन शस्त्रांचा अनोखा संग्रह)" (इंग्लिश मजकूर). द हिंदू. ३१ जुलै, इ.स. २००६. १० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.