कुंभ रास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Aquarius.svg

कुंभ एक ज्योतिष-राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. कुंभ रास ही अकराव्या भागात येते म्हणून ही राशी कुंडलीत ११ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राचा दुसरा चरण(चारातला दुसरा भाग), आणि शततारका हे संपूर्ण नक्षत्र आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात.

ज्योतिषशास्त्रीय मतानुसार ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. मित्र राशी मिथुनतूळ. मिथुन, तूळ व कुंभ राशीची माणसे कानाद्वारे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात. त्यांची वासना कानांत असते. त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही.

स्वभाव[संपादन]

या व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी असतात, असे फलज्योतिष्यात सांगितले आहे. ही जन्मरास असलेल्या बाळाला - गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, द यांपैकी एखाद्या आद्याक्षराचे नाव ठेवतात.

हेही पहा[संपादन]