Jump to content

एर बर्लिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एअर बर्लिन या पानावरून पुनर्निर्देशित)
एर बर्लिन
आय.ए.टी.ए.
AB
आय.सी.ए.ओ.
BER
कॉलसाईन
AIR BERLIN
स्थापना १९७८
हब बर्लिन टेगल विमानतळ
मुख्य शहरे ड्युसेलडॉर्फ
हांबुर्ग
म्युनिक
श्टुटगार्ट
पाल्मा दे मायोर्का
फ्रिक्वेंट फ्लायर topbonus
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या १४१
ब्रीदवाक्य Your Airline.
मुख्यालय बर्लिन
संकेतस्थळ [१]
बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळाकडे निघालेले एर बर्लिनचे एरबस ए३३० विमान

एर बर्लिन PLC & Co. लुफ्तवेर्केर्स केजीचे बोधचीन्ह एरबर्लिन किंवा एरबर्लिन.कॉम आहे. जर्मन देशाची सर्वात मोठी असणारी लुफ्तान्सा एर लाइन नंतर ही मोठी दोन क्रमांकाची एर लाइन आणि प्रवाशी वाहतुकीचे दृष्टीने युरोपची आठ क्रमांकाची एर लाइन आहे.[] या एर लाइन ने बर्लिन टेगेल एरपोर्ट आणि दुस्सेल्डोर्फ एरपोर्ट येथे मुख्य केंद्र (hub) केलेले आहे.[] आणि तेथून 17 जर्मनीतील शहरे, काही युरोप मधील प्रमुख महानगरे आणि फावल्या वेळात दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील कित्येक ठिकाणी नेटवर्क चालते त्याच बरोबर करेबियन आणि अमेरिकेच्या अंतर युरोप मधील ठिकाणी सेवा दिली जाते.

इतिहास

[संपादन]

एर बर्लिन सन 1978 मध्ये पछिम बर्लिन मध्ये अमेरिकन चार्टर वापरून सुरू झाली. ती सन 1990 पर्यंत चालू होती. त्यानंतर सन 1990 ते 2000 या काळात त्याचे मालक नवीन झाले आणि त्यांनी कमी किमतीची विमाने वापरून सेवा सुरू केली. 2000 ते 2006 या काळात ती जर्मनीची दोन क्रमांकाची मोठी एर लाइन झाली. 2007 ते 2012 या काळात या एर लाइन ने विकास केला आणि इतर एर लाइन बरोबर सहकार्याची तडजोड केली.

कंपनी कामकाज

[संपादन]

एर बर्लिन PLC ने क्षेत्र आणि फ्रॅंकफर्ट येथील नियमित शेअर बाजारात खुली भाग विक्री केली. बर्लिन, दुस्सेलडोर्फ, हंबर्ग,म्यूनिच,स्टटगर्ट येथे अनाधिकारीक पद्दतीने शेअर खरेदी विक्री नियमित होत असते. डिसेंबर 2011 पासून एर बर्लिनचे एटीहाड एरवेझ यांचे सर्वात ज्यास्त भाग आहेत. सध्याचे मुख्य भाग धारक 5% पेक्षा जास्त आहेत. त्याची विगटवारी खालील प्रमाणे आहे.

नाव भागधारणा

%

इतिहाड

एरवेझ PJSC

29.21
ESAS

होल्डिंग AS ( पेगसुस एर लाइन यांची मालकी )

12.02
हंस-

जोचिम क्नीप्स

5.48
इतर

भाग धारक

53.29
एकूण 100.00

व्यवसायाची झलक

[संपादन]

31 डिसेंबर पर्यंत चालू वर्ष्याचा निकी सह बर्लिन एरवेझ संघाचा व्यवसाय झलक खाली दर्शविली आहे.

2006 2007 2008 2009 2010 2011 2012 2013 2014
उलाढाल 1575 2537 3401 3240 3850 4227 4312 4147 4160
निव्वळ

नफा

40.1 21.0 -75.0 -9.5 -106.30 -420.4 6.8 -315.5 -376.7
एकूण

कर्मचारी

4108 8360 8311 8278 8900 9113 9284 8905 8440
एकूण

प्रवाशी (M)

19.7 27.9 28.06 27.9 34.9 35.3 33.3 31.5 31.7
प्रवाशी

वजन स्थिति %

75.3 77.3 78.4 77.5 76.8 84.5 83.6 84.9 83.5
वर्षभरातील

एकूण विमाने

117 124 125 152 169 170 155 140 149
उपलब्ध

माहिती क्रंमांक

(93) (94) (95) (96) (97) (98) (99) (100) (3)

वैमानिक प्रशिक्षण

[संपादन]

बर्लिन एर लाइन्स ने TFC कौफर वैमानिक प्रशिक्षण केंद्राबरोबर करार करून वैमानिक प्रशिक्षण योजना सन 2007 पासून कार्यान्वित केली. विमान प्रशिक्षणार्थीनी आधुनिक पद्दतीचे व्यवसायाला साजेशे वैमानिक प्रशिक्षण 24 महिन्यात पूर्ण केले. बर्लिन एर लाइन वैमानिक प्रशिक्षण केंद्र जर्मनीतील पहिले प्रशिक्षण केंद्र ठरले की ज्याने जर्मन वैमानिक कला (एविएशन) खात्याकडून फेब्रुवारी 2009 मध्ये मल्टि – क्र्यु पायलट लायसेन्स प्राप्त केले.

तांत्रिक सेवा

[संपादन]

बर्लिन एर लाइन संघाचा बर्लिन एर हा तांत्रिक विभाग आहे. तो EASA पार्ट - 145 या खात्रीच्या (certified) व्यवस्थापन संघटनेतील जवळ जवळ 1200 कर्मचारी संपूर्ण युरोप मध्ये बर्लिन एर संघामार्फत ग्राहक सेवा देतात.[]

गंतव्यस्थाने

[संपादन]

डिसेंबर २०१५ च्या सुमारास एर बर्लिन आपल्या ११८ विमानांच्या ताफ्यानिशा ३६ देशांतून[] किफायतशीर नियमित विमान सेवा पुरवीत होती. यांत कांही युरोपमधील मोठी शहरे, सुट्टी घालवण्यासाठी रम्य ठिकाणे, भूमध्यसागरीय विभाग, कॅनेरी द्वीपसमूह, उत्तर आफ्रिका, तसेच अमेरिका, कॅरिबियन आणि मध्य पूर्वेतील अनेक शहरांचासमावेश आहे.

सह भागीदारी करार

[संपादन]

बर्लिन एरलाइन्सचे डिसेंबर २०१५ च्या सुमारास खालील विमान कंपन्यांशी कायदेशीर करार केलेले होते.  :

एर बाल्टिक ब्रिटिश एरवेझ फिनएर लॅन एरलाइन्स रॉयल जॉर्डेनियन
एर सर्बिया बल्गेरिया एर हैनान एरलाइन्स मलेशिया एरलाइन्स एस७ एरलाइन्स
अलिटालिया कॅथे पॅसिफिक इबेरीया मेरीडियाना श्रीलंकन एरलाइन
अमेरिकन एरलाइन्स डार्विन एरलाइन्स जपान एरलाइन्स निकी टॅम एरलाइन्स
बँकॉक एरवेझ एतिहाद एरवेझ जेट एर वेझ पिगॅसस एर लाइन्स व्हर्जिन ऑस्ट्रेलिया

विमान ताफा

[संपादन]

जानेवारी 2016 अखेर बर्लिन एर लाइनचे विन संच्यात खालील विमाने होती.[]

विमाने सेवेत मागणी C Y एकूण शेरा
एरबस

A319-100

4 150 150
एरबस

A320-200

47 180 180 6

विमानाचे दर्शनी भाग सजविलेले आहेत

एर

बस A321-200

19 2(106) 210 210 7विमानांचे

दर्शनी सजविलेली आहेत

एर

बस A330-200

14 19 271

336

290

336

मार्च

2016 मध्ये त्याचे 290 आसन व्यवस्थेत रूपांतर केले आहे.(108)

बोइंग

737 -700

6 144 144 TUI

मार्फत 2019 पर्यंत चालविली जाणार आहेत. (109)

बोइंग

737 – 800

25 186 186 2016

ही बंद होणार आहेत

बोंबर्डीर

दश 8Q400

17 76 76 लुफ्ता

वाल्टर चालवितात

साब

2000

2 50 50 30/4/2016

पर्यंत डार्विन एरलाइन चालवनार आहे.

एकूण 134 2

प्रवासी सेवा

[संपादन]

बर्लिन एर लाइन्सची विमाने स्वच्छ आहेतच शिवाय विमानात प्रवाश्यांना अल्पोपअहार, पेये तसेच दैनिक साप्ताहिक मोफत पुरविली जातात. दूर प्रवासाच्या विमानात गरम गरम जेवण मोफत दिले जाते. 60 मिनिटे किंवा त्यापेक्षा ज्यादा प्रवास काळ असणाऱ्या विमानात स्यल्ट बेटावरील प्रशिद्द असणाऱ्या “संसिबर” या उपअहार ग्रहातील स्वादिष्ट जेवण दिले जाते. ही एर लाइन प्रवाश्यांना विमानात मनोरंजन, खास आसन व्यवस्था आणि खात्रिची विमान कनेक्टीव्हिटी असते.

महत्त्वाचे विमान मार्ग

[संपादन]
  • कोह समुई ते बँकॉक साप्ताहिक विमान सेवा
  • लंडन ते एडीनबर्ग साप्ताहिक विमान सेवा
  • ग्लासगो ते लंडन साप्ताहिक विमान सेवा

या शिवाय इतर महत्त्वाच्या विमान सेवा खालील प्रमाणे आहेत.

  • एर बर्लिन मुंबई अबु धाबी
  • एर बर्लिन न्यू दिल्ली अबु धाबी
  • एर बर्लिन हैदराबाद अबु धाबी
  • एर बर्लिन कोचीन अबु धाबी
  • एर बर्लिन बंगलोर अबु धाबी
  • एर बर्लिन चेन्नई अबु धाबी
  • एर बर्लिन कलकत्ता अबु धाबी
  • एर बर्लिन दुस्सेल्दोर्फ म्यूनिच
  • एर बर्लिन म्यूनिच बर्लिन
  • एर बर्लिन बर्लिन म्यूनिच
  • एर बर्लिन म्यूनिच दुस्सेल्दोर्फ
  • एर बर्लिन कलोन बर्लिन
  • एर बर्लिन लंडन एडीनबर्ग
  • एर बर्लिन लंडन ग्लासगो
  • एर बर्लिन कलोन म्यूनिच
  • एर बर्लिन बर्लिन कलोन
  • एर बर्लिन दुस्सेल्दोर्फ बर्लिन
  • एर बर्लिन बर्लिन दुस्सेल्दोर्फ
  • एर बर्लिन बँकॉक कोह समुती
  • एर बर्लिन हंबर्ग म्यूनिच

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "रणनीति और व्यापार मॉडल".
  2. ^ "बर्लिन टेगेल स्टील एयर बर्लिनस् #१ बेस".
  3. ^ "एयर बर्लिन सेवा". 2015-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-02 रोजी पाहिले.
  4. ^ "एयरलाइन नेटवर्क ऑफ डेस्टिनेशन". 2017-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-02 रोजी पाहिले.
  5. ^ "एयर बर्लिन फ्लीट डिटेल्स ॲंण्ड हिंस्ट्री".

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: