पूना मेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पूना मेल ही एक ब्रिटिशकालीन रेल्वे गाडी होती. ही मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांदरम्यान दैनंदिन धावायची. ही ब्रिटिश साम्राज्यातील नामांकित गाडी होती. ही गाडी संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी मुंबई व्हिक्टोरिया टर्मिनसवरून सुटायची आणि रात्री ९:४० वाजता पुण्याला पोहचायची, तसेच पुण्याहून सकाळी ७ वाजता निघायची आणि व्हिक्टोरिया टर्मिनसला ११ वाजून १० मिनिटांनी पोचायची. या गाडीला टपालाचा एक डबा असे, त्यातून टपालाची वाहतूक होई. या डब्याला बाहेरच्या बाजूने असलेल्या तिरकस खिडकीच्या झडपेतून डब्यात पत्रे टाकता येत असत.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या गाडीला कोल्हापूरपर्यंत वाढवण्यात आले आणि हिचे नाव सह्याद्रि एक्सप्रेस ठेवण्यात आले.