इंटरस्टेट ८०
Appearance
(आय-८० या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग आय-८० | |
---|---|
Interstate 80 map.png | |
लांबी | ४,६६६.३६ किमी |
सुरुवात | सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया |
मुख्य शहरे | ओकलंड, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, शायान, लिंकन, ओमाहा, दे मॉईन, टोलेडो, शिकागो (उपनगरांतून), क्लीव्हलॅंड (उपनगरांतून) |
शेवट | टीनेक, न्यू जर्सी |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
आय-५ (साक्रामेंटो, कॅलिफोर्निया) आय-१५ (सॉल्ट लेक सिटी, युटा) आय-२५ (शायान, वायोमिंग) आय-२९ (काउन्सिल ब्लफ्स, आयोवा) आय-३५ (दे मॉईन, आयोवा) आय-७४ (डॅव्हेनपोर्ट, आयोवा) आय-५५ (चॅनाहोन, इलिनॉय) आय-६५ (गॅरी, इंडियाना) आय-९० (लेक स्टेशन, इंडियाना-इलिरिया, ओहायो) आय-७५ (रॉसफोर्ड, ओहायो) आय-९५ टीनेक, न्यू जर्सी |
राज्ये | कॅलिफोर्निया, नेव्हाडा, युटा, वायोमिंग, नेब्रास्का, आयोवा, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यू जर्सी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
इंटरस्टेट ८० तथा आय-८० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यभागातून भागात पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता कॅलिफोर्निया राज्यातील सान फ्रांसिस्को शहराला न्यू जर्सी राज्यातील टीनेक शहराला जोडतो. याचे पूर्वेचे टोक न्यू यॉर्क शहरापासून ४ मैल अंतरावर आहे. संपूर्ण देश पार करणारा हा महामार्ग अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात लांब इंटरस्टेट महामार्ग (आय-९० नंतर) आहे.
हा महामार्ग २,८९९.५४ मैल (४,६६६.३६ किमी) लांबीचा असून तो कॅलिफोर्निया, नेव्हाडा, युटा, वायोमिंग, नेब्रास्का, आयोवा, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया आणि न्यू जर्सी राज्यांतून जातो.