गॅरी (इंडियाना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गॅरी, इंडियाना या पानावरून पुनर्निर्देशित)

गॅरी अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील शहर आहे. मिशिगन सरोवराच्या काठावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८०,२९४ होती. १९६०मधील वस्तीपेक्षा ही संख्या अर्ध्यापेक्षा कमी होती.

गॅरी शहराची स्थापना १९०६मध्ये युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन या पोलादकंपनीने केली. शहराला कंपनीच्या स्थापक एल्बर्ट हेन्री गॅरीचे नाव देण्यात आले होते.

मायकेल जॅक्सनचा समावेश असलेल्या जॅक्सन ५ या संगीतसमूहाचे गॅरी हे मूळ गाव आहे. याशिवाय फ्रॅंक बोर्मन, जोसेफ स्टिग्लिट्झ, पॉल सॅम्युअलसन हे सुद्धा गॅरीमध्ये वाढले.

इंटरस्टेट ८० आणि इंटरस्टेट ६५ या महामार्गांचा तिठा गॅरीमध्ये आहे.