Jump to content

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अखिल भारतीय मराठी नाटक परिषद या पानावरून पुनर्निर्देशित)

अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६ असा आहे. दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३० ०५९४ असा आहे.

नाट्यपरिषदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.

परिषदेची पुणे शाखा २५ मे १९७८ रोजी व पिंपरी-चिंचवड शाखा ऑगस्ट १९९६मध्ये स्थापन झाली. ही शाखा गेली १७ वर्षे (इ.स.१९९६ ते २०१३ आणि पुढे) भाऊसाहेब भोईर चालवीत आहेत.

इतिहास. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे

[संपादन]

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही दरवर्षी नाट्य अभिनेत्यांना आणि अन्य नाट्यकर्मींना अनेक पुरस्कार देते. त्यांतील काही पुरस्कार :

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१७ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी व अन्यजण

एकपात्री कलाकारासाठीचा मधुकर टिल्लू स्मृती पुरस्कार - डॉ. विश्वास मेहेंदळे; रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा करणाऱ्या मधू गायकवाड यांना भार्गवराम आचरेकर स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान; संगीत क्षेत्रातील दीर्घकालीन सेवेबद्दल माणिक वर्मा पुरस्कार - अशोक काळे; ५० वर्षांहून अधिक नाट्यसेवेसाठी बबनराव गोखले पुरस्कार- चंद्रकांत काळे; सुनील तारे स्मृती पुरस्कार - सिद्धेश्वर झाडबुके; गो.रा. जोशी स्मृती नाटक समीक्षक पुरस्कार - वीरेंद्र विसाळ; लोकनाट्यातील कलाकारासाठीचा मधू कडू स्मृती पुरस्कार - संतोष पवार; यशवंत दत्त स्मृती पुरस्कार - चैतन्य देशमुख; पार्श्वनाथ आळतेकर स्मृती उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक - दीपक रेगे; पडद्यामागील कलाकारासाठी छोटा गंधर्व पुरस्कार - सुरेंद्र गोखले; दिवंगत कलाकार पत्‍नीस देण्यात येणारा रमाबाई गडकरी स्मृती पुरस्कार - प्रतिमा रवींद्र काळेले; संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल दिवाकर स्मृती पुरस्कार - नंदकुमार भांडवलकर; उदयोन्मुख संगीत कलाकारासाठीचा वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार - श्रद्धा सबनीस; रंगभूमीवरील वा चित्रपटातील विनोदी कलाकाराकरिता असलेला वसंत शिंदे स्मृती पुरस्कार -आशुतोष वाडेकर; लोकनाट्यातील विनोदी कलावंताकरिता असलेला राम नगरकर स्मृती पुरस्कार - पराग चौधरी; परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार - राजेश बारबोले; गंगाधरपंत लोंढे स्मृती पुरस्कार - डॉ. संजीवकुमार पाटील; मनोरमा नातू नाट्यलेखन पुरस्कार - आशुतोष पोतदार; नेपथ्यकार पु.श्री. काळे स्मृती पुरस्कार - रवी पाटील; उत्कृष्ट अभिनय (राज्यनाट्य स्पर्धा) - जयदीप मुजुमदार; उत्कृष्ट दिग्दर्शक (राज्यनाट्य स्पर्धा) - सुबोध पंडे; उत्कृष्ट नाट्य निर्मिती (राज्यनाट्य स्पर्धा) - प्रयोग, पुणे; उत्कृष्ट अभिनय स्त्री (राज्यनाट्य स्पर्धा) - शर्वरी जाधव

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे २०१६ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी/नाटके
  • चंदू डेग्वेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार, रोख ५१ हजार, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • संगीत रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटकासाठी "संगीत संशयकल्लोळ‘ आणि "संगीत बावनखणी‘ या नाटकांना पुरस्कार
  • बंडा जोशी (एकपात्रीसाठी), कृष्णा जाधव (नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार), राज काझी (नाट्य समीक्षक पुरस्कार), "रंगगंध चाळीसगाव‘ (सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था), देवदत्त पाठक (बालरंगभूमी), सुनील परमार (नाट्य परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार), रकाश एदलाबादकर (निवेदक), दिवंगत आनंद मोघे (गुणी रंगमंच कामगार पुरस्कार), प्रकाश साळवे (लोककलावंत) आणि रंगभूमी व्यतिरिक्त इतर क्षेत्रांत भरीव काम केल्याबद्दल सुशांत घोडके यांनाही पुरस्कार प्रदान झाले.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१५ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१६ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी

तबलावादक पांडुरंग मुखडे (माणिक वर्मा पुरस्कार), मधू कांबीकर नटवर्य केशवराव दाते पुरस्कार, प्रियांका बर्वे (वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार.

परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेले अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे : भार्गवराम आचरेकर पुरस्कार – स्वरांजली ऊर्फ शोभा काळे, बबनराव गोखले पुरस्कार – पद्मजा कुलकर्णी, मधुकर टिल्लू पुरस्कार – विजय कोटस्थाने, सुनील तारे पुरस्कार – लोकेश गुप्ते, गो.रा. जोशी पुरस्कार – सुशांत सांगवे, मधू कडू पुरस्कार – रवींद्र देशमुख, यशवंत दत्त पुरस्कार – नरेंद्र डोळे, पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार – राज कुबेर, छोटा गंधर्व पुरस्कार – गजानन वाटाणे, रमाबाई गडकरी पुरस्कार – शारदा लक्ष्मण भोसले, दिवाकर पुरस्कार – रवींद्र घांगुर्डे, वसंत शिंदे पुरस्कार – श्रीप्रकाश सप्रे, राम नगरकर पुरस्कार – संदीप पायगुडे, शाखा कार्यकर्ता पुरस्कार – गिरीश गोडबोले, गंगाधरपंत लोंढे पुरस्कार – विश्वनाथ लिमये, मनोरमा नातू पुरस्कार – क्षितिज पटवर्धन, राज्य नाटय़ स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनय-दिग्दर्शन – श्रीकांत भिडे, नाटय़निर्मिती – ध्यास पुणे, स्त्री अभिनय – वरदा जाधव, कामगार कल्याण नाटय़स्पर्धा दिग्दर्शक – मनोज देशपांडे, अभिनय – दिलीप आंग्रे, प्रणिता दामले.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे पुरस्कार(२०१२), आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी

हे सुद्धा पहा

[संपादन]

पुरस्कार