Jump to content

आशा काळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशा काळे
जन्म आशा काळे
२३ नोव्हेंबर १९४८
गडहिंग्लज
इतर नावे गौरी माधव नाईक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पती माधव पांडुरंग नाईक

आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे झाले असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म २३नोव्हेंबर १९४८रोजी गडहिंग्लज येथे झाला. शालेय शिक्षण कोल्हापूर अणि पुणे येथे झाले. वयाच्या १४व्या वर्षी नाटकांत कामे करावयास सुरुवात केल्याने त्यांना कॉलेजचे शिक्षण मिळाले नाही. कथ्थक नृत्याचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून त्या सुरुवातीला नृत्याचे कार्यक्रमही करीत. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत जा' हे, आणि पहिला चित्रपट 'तांबडी माती'. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली.

समाजप्रबोधनात्मक माहितीपट, लघुपट आणि मराठी चित्रपट निर्माते माधव पांडुरंग नाईक (निधन सप्टेंबर २०१३) हे आशा काळे यांचे पती होत.

२००८साली गोव्यात झालेल्या ६व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आशा काळे यांच्या हस्ते झाले होते.

आशा काळे यांची नाटके

[संपादन]
  • एक रूप अनेक रंग
  • एखादी तरी स्मितरेषा
  • गहिरे रंग
  • गुंतता हृदय हे
  • घर श्रीमंताचं
  • देव दीनाघरी धावला
  • नल दमयंती
  • पाऊलखुणा
  • फक्त एकच कारण
  • बेईमान
  • महाराणी पद्मिनी
  • मुंबईची माणसं
  • लहानपण देगा देवा
  • वर्षाव
  • वाऱ्यात मिसळले पाणी
  • वाहतो ही दुर्वांची जुडी
  • विषवृक्षाची छाया
  • वेगळं व्हायचंय मला
  • साटं लोटं
  • सीमेवरून परत जा
  • संगीत सौभद्र
  • घर श्रीमंतांचे

चित्रपट :

  • अर्धांगी (१९८५)
  • अशी रंगली रात्र (१९७०)
  • अष्ट विनायक (१९७९)
  • आई पाहिजे (१९८८)
  • आयत्या बिळावर नागोबा (१९७९)
  • कुंकवाचा करंडा (१९७१)
  • कुलस्वामिनी अंबाबाई (१९८४)
  • कैवारी (१९८१)
  • गणाने घुंगरू हरवले (१९७०)
  • गनिमी कावा (१९८१)
  • घर गंगेच्या काठी(१९७५)
  • चादणे शिंपीत जा (१९८२)
  • चुडा तुझा सावित्रीचा (१९७१)
  • चोराच्या मनात चांदणे (१९८४)
  • ज्योतिबाचा नवस (१९७५)
  • तांबडी माती (१९६९)
  • थोरली जाऊ (१९८३)
  • देवता (१९८३)
  • पुत्रवती (१९९६)
  • बंदीवान मी या संसारी (१९८८)
  • बंधन (१९९१)
  • बायकोचा भाऊ (१९६२)
  • बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७)
  • माहेरची माणसे (१९८४)
  • सतीची पुण्याई (१९८०)
  • सतीचे वाण (१९६९)
  • संसार (१९८०)
  • सासुरवाशीण (१९७८)
  • हा खेळ सावल्यांचा (१९७६)
  • हीच खरी दौलत (१९८०)

दूरचित्रवाणी मालिका :

  • इंद्रधनू
  • महाराणी पद्मिनी

पुरस्कार

[संपादन]
  • २००८साली रंगत संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाउंडेशनने दिलेला 'माणूस' पुरस्कार
  • ठाणे महापालिकेचा २००८सालचा 'गंगाजमुना' पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाचा 'व्ही.शांताराम जीवनगौरव' पुरस्कार
  • भारती विश्वविद्यालयाचा २०११सालचा 'जीवनसाधना' गौरव पुरस्कार
  • संस्कृती कलादर्पण पुरस्कार (२८ एप्रिल २०१५)
  • पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानचा ’शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ (१९-१२-२०१५)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार (१४-६-२०१६)