मधू कांबीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मधू कांबीकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

मधू कांबीकर या ’शापित’ नावाच्या मराठी चित्रपटातून प्रसिद्धीस आलेल्या मराठी अभिनेत्री आहेत.[१] त्या चित्रपटानंतर पुढे त्या ३० वर्षांहून अधिक वर्षे चित्रपटसृष्टीत ठामपणे अभिनय करत राहिल्या.

प्रतिकूल परिस्थितीत अभिनय सामर्थ्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान आणि वेगळी ओळख निर्माण करणार्‍या कलावंत म्हणून मधू कांबीकर यांना ओळखले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील कांबी गावापासून सुरू झालेल्या प्रवासात अनेक संकटे आली तरी त्यांनी धीर न सोडता आत्मविश्वासाने परिस्थितीवर मात केली. पूर्वी खेडोपाडी नाटके होत असत, तशी कांबी आणि आसपासही होत. कांबीकर याचे वडीलही कलाकार. ते त्यांना नाटकांना घेऊन जात. त्यातून त्यांची कलावंत म्हणून जडणघडण झाली. शाळेत त्यांचे मन रमले नाही. परंतु, तमाशाच्या फडात त्यांनी पायात चाळ बांधले आणि तिथल्या परीक्षेत मात्र त्या एकेक गड सर करीत गेल्या. अस्सल खानदानी लावणी सादर करता करताच त्या लावणीची परंपरा जपण्यासाठी आणि अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या अखंड प्रयत्‍न करीत राहिल्या.

लावणीच्या चाहत्या वर्गाला लावणीचा इतिहास कळावा, यासाठी त्यांनी लावणीबाबतचे जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून त्याद्वारे तमाशाचा इतिहास गुंफण्याचे महत्त्वाचे काम केले. हे अवघड काम यशस्वी करण्यासाठी मधू कांबीकरांना त्याच्या तमाशा फडातील ११ कलाकारांनी भरपूर मदत केली. या इतिहासावर आधारित असा ’सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम कांबीकर रंगमंचावर सादर करतात.

कांबीकर यांनी पुण्यातल्या बाळासाहेब भोसले यांच्याकडून कथ्थकचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. एवढेच नव्हे, तर त्यांना पेशवेकालीन परंपरा सादर करण्याचा मानही त्यांना मिळाला.

शापित चित्रपटाने कांबीकर यांच्यातल्या अभिनेत्रीची भारतीय चित्रपटसृष्टीलाही जाणीव झाली. त्यानंतर ३५ वर्षांनंतरही त्यांची त्यातील भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे. पुढे तमाशातली लावणी थिएटरमध्ये आली आणि शहरी प्रेक्षकांनाही साद घालू लागली. मधू कांबीकर यांना मात्र लावणीचे हे नवे रूप फारसे रुचत नाही. शिवलेली साडी परिधान करून नाचणार्‍या या ‘फॅन्सी लावणी सम्राज्ञी’ असल्याचे मत त्यांनी एकदा जाहीरपणे व्यक्त केले.

जब्बार पटेल यांनी 'एक होता विदूषक'मध्ये पारंपरिक लावणीचे दर्शन घडवण्यासाठी उषा नाईक आणि मधू कांबीकर यांना घेतले. 'भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं बाई, श्रावणाचं उन्ह मला झेपेना' किंवा 'कुटं तुमि गेला होता सांगा कारभारी' या लावण्यांमधील मधू कांबीकरांची अदा अस्सल लावणी कलावंताची साक्ष देतात. 'एक होता विदूषक'प्रमाणेच 'झपाटलेला'मधील लक्ष्याच्या आईची भूमिका, तसेच संत गाडगेबाबांच्या जीवनावरील 'डेबू'चित्रपटातील डेबूच्या आईची भूमिकाही त्यांनी संस्मरणीय बनवली. दादा कोंडके यांच्यासोबत 'येऊ का घरात', 'मला घेऊन चला' हे चित्रपट करून त्यांनी आपण कोणत्याही प्रकारची भूमिका करू शकतो, हे दाखवून दिले होते.[ संदर्भ हवा ]

मधू कांबीकर यांनी काम केलेले चित्रपट[संपादन]

 • अन्यायाचा प्रतिकार
 • आई तुळजा भवानी
 • आज झाले मुक्त मी (१९८६)
 • आभ्राण (२०१५)
 • एक होता विदूषक (१९९२)
 • कथा तिच्या लग्नाची (२००९)
 • कर्ज कुंकवाचं (२००९)
 • कर्तबगार (२०१२)
 • खट्याळ सासू नाठाळ सून
 • गोंद्या मारतंय तंगडं (२००८)
 • गोष्ट छोटी डोंगराएवढी (२००९)
 • घे भरारी
 • चल रे लक्ष्या मुंबईला
 • चित्रा (२०१०)
 • झपाटलेला २ (२०१३)
 • डेबू (२०१०) - गाडगे बाबांच्या आई -सखुबाई
 • दुर्गा म्हणत्यात मला
 • देवाचिये द्वारी
 • दोघी (१९९५)
 • निर्मला मच्छिंद्र कांबळे (१९९९)
 • बिन कामाचा नवरा (१९८४)
 • मला एक चानस हवा
 • मला घेऊन चला
 • माहेरची माया
 • मी अमृता बोलतेय (२००८)
 • मुंबईचा डबेवाला (२००८)
 • यशवंत (१९९७)
 • येऊ का घरात (१९९२)
 • रंगी बेरंगी (२००८)
 • राघू मैना
 • राजा पंढरिचा
 • वादळ वारं सुटलं गं (२००७)
 • विश्वविनायक (१९९४)-तुळशी
 • शापित
 • संत नामदेव
 • संभा-आजचा छावा (२०१२)
 • सवाल माझा प्रेमाचा
 • सांडू हवालदार (२०१२)
 • सातवाँ आसमाँ (१९९२)
 • सावर रे (२००८)
 • सूत्रधार (१९८७)
 • स्वप्न माझं प्रेमाचं
 • हम दोनो (१९९५)
 • होऊन जाऊ दे (२००९)

लेखन[संपादन]

 • मधुरंग (मधू कांबीकर यांच्या कलाजीवनातील आठवणी सांगणारे आत्मचरित्र)

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ कांबीकर, मधु (२०१२). मधुरंग. पुणे,३०: संस्कृती प्रकाशन. pp. ७५–९३.