विकिपीडिया:सदर/जून २००५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुखपृष्टावरील साप्ताहिक सदर - वर्ष २००५
जानेवारी - फेब्रूवारी - मार्च - एप्रिल - मे - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबर


पहिला आठवडा[संपादन]

(जून ६)

चित्र:ऋतू-१.png
पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील हिवाळ्याची परिस्थिती

अफाट विश्व्यामध्ये एका लहानशा दीर्घिकेमध्ये एका छोट्याशा सूर्य नावाच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या पृथ्वी नावाच्या ग्रहाचे एक ठळक वैशिष्ठ म्हणजे तेथील जीवसृष्टी. पृथ्वीवर अनेक घटकांमुळे जीवसृष्ठीला पोषक वातावरण मिळाले ज्यामध्ये ऋतूंचा क्रम बराच वरचा आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू भारतात आहेत, तर जगातील विविध प्रदेशांमध्ये निर्माण होणारे ऋतूंमध्ये देखील विविधता आढळते, जसे संयुक्त संस्थाने या देशातील एका भागात जून महिन्याच्या सुमारास वादळांचा ऋतू असतो तर प्राचीन इजिप्तमध्ये पूराचा ऋतू आणि पूर् ओसरण्याचा ऋतू आणि सुगीचा ऋतू असे तीन ऋतू होते. ऋतूनुसार प्राणी आणि वनस्पती त्यांच्या जीवनपद्धती बदलतात जसे हिवाळ्यात बेडूक शीतझोप घेतात आणि हिवाळा संपल्यानंतर पुन्हा जागे होतात. ऋतू हा लेख या संदर्भात अधिक माहिती देईल.

मागील अंक - मे ३० - मे २३ - मे १६

पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास




दुसरा आठवडा[संपादन]

(जून १३)

इ.स. १७६० मध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार(पिवळ्या रंगात)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली इ.स. १६७४ साली निर्माण झालेल्या स्वराज्याचे त्यापुढील शंभर वर्षांमध्ये मराठा साम्राज्यात रूपांतर झाले. सोबतच्या नकाशामध्ये पिवळ्या रंगातील भाग इ.स. १७६० सालच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवितो. पश्चिमेला सुरत (गुजरात, पूर्वेला पाटणा (बिहार) तसेच उत्तरेला अटक (हरियाणा) आणि दक्षिणेला तंजावर (कर्नाटक) या साम्राज्याच्या सीमा होत्या. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर काही काळ साम्राज्याला अराजकाचे ग्रहण लागले आणि यादवीची देखील लक्षणे दिसू लागली परंतू छत्रपती शाहू महाराज यांनी नौदलप्रमुख कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ यांना हाताशी धरून मराठा साम्राज्यावर पूर्ण वर्चस्व स्थापित केले. बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा हे पद बहाल केले (जे पंतप्रधान या पदाच्या समान आहे). पुढे वंशपरंपरेने बाळाजीचे थोरले चिरंजीव बाजीराव बाळाजी (बाजीराव पहिला) यांच्याकडे पेशवेपद आले आणि त्यांच्या कारकिर्दीत अनेक राज्ये जिंकून घेत स्वराज्याला जोडली. बाजीराव एकही लढाई हारले नाही ज्यामुळे त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट पुलकेशी, चंद्रगुप्त विक्रमादित्य, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य यांच्या तोडीचा रणधुरंधर म्हणून घेतले जाते.

पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास




तिसरा आठवडा[संपादन]

(जून २०)

दशावतार प्रतिमा आणि चित्रे असलेले गंजिफ़ाचे काही पत्ते

गंजिफ़ा या नावाचा पत्त्यांचा खेळ भारतात मुघल काळात आणि त्यानंतर प्रसिद्ध होता. प्रचलित पत्त्यांच्या खेळापेक्षा वेगळ्या प्रकारे गंजिफ़ा खेळल्या जायचा. तत्कालिन अमीर, उमराव वगैरे उच्चवर्तुळामध्ये हा खेळ प्रिय होता. पत्ते मुख्यतः गोल आकाराचे असत आणि त्यावर विविध चित्रे आणि नक्षी रंगविलेली असत. सोने, चांदी, हस्तिदंती यांच्यापासून देखील पत्ते बनविले जात. गंजिफ़ामध्ये पत्त्यांचे अनेक संच वापरले जात आणि त्यांची संख्या खेळाचे स्वरूप, परंपरा, व्यक्ति इत्यादि प्रमाणे बदलत असे. उदाहरणार्थ दशावतार गंजिफ़ा दहा संचांचा बनलेला असे आणि प्रत्येक संचात बारा पत्ते असत. सर्वात जास्त पत्ते राशी गंजिफ़ा या प्रकारात असत आणि बारा पत्यांचे बारा संच वापरले जात. युद्ध, सामरिक रचना यांच्याशी निगडित कल्पनांचा समावेश गंजिफ़ात केला जात असे.

पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास