Jump to content

विकिपीडिया:सदर/जून २०, २००५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दशावतार प्रतिमा आणि चित्रे असलेले गंजिफ़ाचे काही पत्ते

गंजिफ़ा या नावाचा पत्त्यांचा खेळ भारतात मुघल काळात आणि त्यानंतर प्रसिद्ध होता. प्रचलित पत्त्यांच्या खेळापेक्षा वेगळ्या प्रकारे गंजिफ़ा खेळल्या जायचा. तत्कालिन अमीर, उमराव वगैरे उच्चवर्तुळामध्ये हा खेळ प्रिय होता. पत्ते मुख्यतः गोल आकाराचे असत आणि त्यावर विविध चित्रे आणि नक्षी रंगविलेली असत. सोने, चांदी, हस्तिदंती यांच्यापासून देखील पत्ते बनविले जात. गंजिफ़ामध्ये पत्त्यांचे अनेक संच वापरले जात आणि त्यांची संख्या खेळाचे स्वरूप, परंपरा, व्यक्ति इत्यादि प्रमाणे बदलत असे. उदाहरणार्थ दशावतार गंजिफ़ा दहा संचांचा बनलेला असे आणि प्रत्येक संचात बारा पत्ते असत. सर्वात जास्त पत्ते राशी गंजिफ़ा या प्रकारात असत आणि बारा पत्यांचे बारा संच वापरले जात. युद्ध, सामरिक रचना यांच्याशी निगडित कल्पनांचा समावेश गंजिफ़ात केला जात असे.