विकिपीडिया:सदर/जून १३, २००५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इ.स. १७६० मध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार(पिवळ्या रंगात)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली इ.स. १६७४ साली निर्माण झालेल्या स्वराज्याचे त्यापुढील शंभर वर्षांमध्ये मराठा साम्राज्यात रूपांतर झाले. सोबतच्या नकाशामध्ये पिवळ्या रंगातील भाग इ.स. १७६० सालच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवितो. पश्चिमेला सुरत (गुजरात, पूर्वेला पाटणा (बिहार) तसेच उत्तरेला अटक (हरियाणा) आणि दक्षिणेला तंजावर (कर्नाटक) या साम्राज्याच्या सीमा होत्या. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर काही काळ साम्राज्याला अराजकाचे ग्रहण लागले आणि यादवीची देखील लक्षणे दिसू लागली परंतू छत्रपती शाहू महाराज यांनी नौदलप्रमुख कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ यांना हाताशी धरून मराठा साम्राज्यावर पूर्ण वर्चस्व स्थापित केले. बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा हे पद बहाल केले (जे पंतप्रधान या पदाच्या समान आहे). पुढे वंशपरंपरेने बाळाजीचे थोरले चिरंजीव बाजीराव बाळाजी (बाजीराव पहिला) यांच्याकडे पेशवेपद आले आणि त्यांच्या कारकिर्दीत अनेक राज्ये जिंकून घेत स्वराज्याला जोडली. बाजीराव एकही लढाई हारले नाही ज्यामुळे त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट पुलकेशी, चंद्रगुप्त विक्रमादित्य, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य यांच्या तोडीचा रणधुरंधर म्हणून घेतले जाते.