विकिपीडिया:सदर/मे ३०
Appearance
लिनक्स ही संगणक कार्यप्रणाली जगभर वेगाने लोकप्रिय होत आहे. या लोकप्रियातेमागे अनेक महत्वाची कारणे सांगता येईल -
- युनिक्स या जुन्या आणि गुणवत्ता तसेच कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या कार्यप्रणालीचा पाया
- मुक्त स्रोताची भलावण करणार्या नू संस्थेचा पाठिंबा
- जगभरातील सुमारे काही सहस्र लोकांचे योगदान
- माफक किंमत
- आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिळालेल्या संपूर्ण स्वातंत्र्यामुळे उत्साहित वापरकर्त्यांकडून निर्माण आणि (नू सार्वजनिक परवान्याखाली) वितरीत होणार्या अनेक संगणक प्रणाल्या.
लिनक्स ही फक्त एक कार्यप्रणाली असून अनेकविध प्रणाल्या जोडून एक लिनक्स वितरण बनते. अशी अनेक वितरणे सध्या उपलब्ध आहेत, जसे की डेबिअन लिनक्स, रेडहॅट लिनक्स, फेदोरा लिनक्स, उबुंटु लिनक्स, सुसे लिनक्स, मॅंड्रेक लिनक्स, वगैरे (ही यादी सहज शंभरावर जाते, अधिक माहिती येथे मिळेल). लिनस टोरवाल्डस् या संगणक अभियंत्याने विद्यार्थीदशेत तयार केलेली ही कार्यप्रणाली मूळची मिनिक्स या कार्यप्रणालीवर आधारित आहे. पुढे रिचर्ड स्टॉलमन या प्रख्यात संगणक शास्त्रज्ञाने स्थापिलेल्या आणि स्रोताच्या मुक्ततेचा पुरस्कार करणार्या नू या संस्थेने लिनक्सला दत्तक घेऊन नू/लिनक्स असे नामांतर केले, परंतु ही कार्यप्रणाली 'लिनक्स' म्हणूनच जगभर ओळखली जाते.