२०१६ प्रो कबड्डी लीग सीझन हा प्रो कबड्डी लीगचा तिसरा सीझन होता, २०१४ पासून भारतात खेळली जाणारी ही एक प्रोफेशनल कबड्डी लीग आहे. दुसऱ्या सीझनमध्ये चकित करणारे यश मिळवल्यानंतर अवघ्या ५ महिन्यांत, ३० जानेवारी २०१६ पासून लीगचा बहुप्रतिक्षित तिसरा मोसम पुनरागमन करण्यासाठी सज्ज होता. तिसऱ्या मोसमाचा पहिला टप्पा हैदराबादमध्ये सुरू झाला. पहिला सामना तेलगू टायटन्स विरुद्ध यू मुम्बा टायटनच्या होम टर्फ, गचीबावली इनडोअर स्टेडियमवर खेळला गेला होता.
आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन, आशियाई कबड्डी फेडरेशन आणि भारतीय हौशी कबड्डी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मशाल स्पोर्ट्स आणि स्टार इंडिया द्वारे आयोजित स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी ही आता द्विवार्षिक लीग होणार आहे, ज्यामध्ये दरवर्षी दोन स्पर्धा होतील. स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी अनेक कार्यक्रम तसे त्यांना कबड्डी खेळण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
लीगच्या तिसऱ्या मोसमात ३४ दिवसांत ८ शहरांमधील अत्याधुनिक इनडोअर स्टेडियममध्ये खास विकसित केलेल्या मॅट्सवर ६० सामने खेळवले गेले. पहिल्या दोन हंगामांप्रमाणेच ‘कारवां शैली’ स्वरूपाचे अनुसरण करून, लीग प्रत्येक फ्रँचायझी शहरात ४ दिवसांच्या कालावधीसाठी खेळवली गेली, जिथे घरच्या संघाने भेट देणाऱ्या ४ फ्रँचायझींविरुद्ध सामना केला. भेट देणाऱ्या सातही फ्रँचायझी संघांनी इतर प्रत्येक शहरात सामने खेळले.
हैदराबादमध्ये सुरुवातीच्या टप्प्यानंतर, काफिला बेंगळुरूच्या कांतीरवा इनडोअर स्टेडियमकडे आणि त्यानंतर कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियमकडे गेला. मोसमाच्या पुर्वाधाची सांगता, बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथील बॅडमिंटन मैदानात झाली. लीगच्या उत्तरार्धात कारवा पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पाटणा येथील इनडोअर स्टेडियम नंतर २० फेब्रुवारी २०१६ रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये रवाना होईल. जयपूरनंतर, लीग त्यागराज इनडोअर स्टेडियम, दिल्ली येथे आणि त्यानंतर शेवटचा टप्पा गतविजेत्या मुंबई मधील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया, खेळवला गेला. उपांत्य फेरी, प्लेऑफ आणि अंतिम फेरीसाठी प्लेऑफ राष्ट्रीय राजधानीत परतले.
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी ही एकमेव देशांतर्गत भारतीय स्पोर्ट्स लीग आहे जिच्या पहिल्या मोसमाच्या तुलनेत प्रेक्षकांमध्ये जोरदार वाढ झाली आहे. दुसऱ्या सीझनमध्ये दर्शकांची वाढ ही दर्शकांच्या सीझन 1च्या सुरुवातीच्या उत्सुकतेपासून ते कबड्डी या भारतीय खेळाच्या महत्त्वाकांक्षी अवताराशी सखोल आत्मीयता आणि प्रतिबद्धतेपर्यंतच्या प्रगतीचे प्रमाणीकरण करते.
मुख्य शहरी युवा प्रेक्षकांमध्ये लीग खूपच लोकप्रिय होत आहे. सीझन २ च्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये मेट्रो शहरांचे योगदान एकूण दूरचित्रवाणी दर्शकसंख्येमध्ये ६५% होते, जी शहरी प्रेक्षकांची या खेळाविषयीची आत्मियता दर्शवते. केवळ टीव्हीच नाही तर इतर डिजिटल माध्यमांमध्येही स्पर्धेचा प्रेक्षकांवर प्रभाव दिसून आला . सीझन २ च्या ऑनलाइन व्ह्यूअरशिपमध्ये आधीच सुमारे २० पट वाढ झाली होती आणि आजपर्यंत १३ दशलक्षाहून अधिक दर्शक स्पर्धेला प्राप्त झाले. ही सोशल मीडियावरील सर्वात जास्त चर्चा केल्या गेलेल्या घटनांपैकी एक आहे आणि लीग संदर्भात ३,१०,००० संभाषणांना जगभरात ५.७३ अब्ज दर्शक मिळाले.