निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान
Appearance
डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान ही सोलापुरातील एक सामाजिक संस्था आहे.
ही संस्था सन २००७ पासून दरवर्षी साहित्यसेवा, समाजसेवा यांबद्दल पुरस्कार देते. २५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :- रा. ग. जाधव, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. द.ता. भोसले, राजन खान, प्रा. निशिकांत ठकार, डाॅ. रावसाहेब कसबे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ.गंगाधर पानतावणे, द.मा. मिरासदार, ल.सि. जाधव यांना संस्थेतर्फे साहित्य पुरस्कार देण्यात आले. त्याचप्रमाणे पन्नालाल सुराणा, प्रकाश आमटे, बाबा आढाव, गिरीश कुलकर्णी, डॉ. अनिल अवचट, डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. प्रवीण पाटकर, सिंधुताई सपकाळ यांना समाजसेवा पुरस्कार देण्यात आले.