लोहा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोहा विधानसभा मतदारसंघ - ८८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, लोहा मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या १. लोहा तालुक्यातील मालाकोळी, कलांबर, कापसी बुद्रुक, लोहा ही महसूल मंडळे आणि लोहा नगरपालिका, २. कंधार तालुक्यातील उस्मान नगर, बारुळ, कंधार ही महसूल मंडळे आणि कंधार नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. लोहा हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर दगडुजी शिंदे हे लोहा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ श्यामसुंदर दगडुजी शिंदे शेतकरी कामगार पक्ष
२०१४ प्रतापराव चिखलीकर शिवसेना
२००९ शंकर(अण्णा) धोंडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".