फ्रँकलिन पियर्स
| फ्रँकलिन पियर्स | |
|
|
|
| सही | |
|---|---|
फ्रँकलिन पियर्स (मराठी लेखनभेद: फ्रँकलिन पीयर्स ; इंग्रजी: Franklin Pierce ;) (२३ नोव्हेंबर, इ.स. १८०४ - ८ ऑक्टोबर, इ.स. १८६९) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा चौदावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५२ ते ४ मार्च, इ.स. १८५७ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. त्याआधी त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात न्यू हँपशायर संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.
पियर्स पेशाने वकील होता. इ.स. १८४६ ते इ.स. १८४८ या कालखंडातील मेक्सिकन-अमेरिकन युद्धात तो स्वयंसेवक म्हणून सैन्यात भरती झाला. मेक्सिको सिटीच्या लढाईत विजयी झालेल्या अमेरिकी फौजांच्या एका ब्रिगेडीचे नेतृत्व त्याने केले होते.
अध्यक्षीय कारकिर्दीत त्याने अप्रत्यक्षरित्या गुलामगिरी-धार्जिण्या असणाऱ्या इ.स. १८५४च्या कॅन्सस-नेब्रास्का कायद्यास पाठिंबा दिला, तसेच त्याच्या राजवटीने ऑस्टेंड मॅनिफेस्टो पुरस्कारला. या दोन धोरणांमुळे उत्तरेकडील संस्थानांमध्ये पियर्स प्रशासनाच्या लोकप्रियतेस तडा गेला. या दोन धोरणांमुळे अध्यक्षीय कारकिर्द डागाळली गेलेला पियर्स अमेरिकी इतिहासातील सर्वांत अप्रिय ठरलेल्या अध्यक्षांपैकी एक मानला जातो. त्याच्या खालावलेल्या लोकप्रियतेमुळे डेमॉक्रॅटिक पक्षाने इ.स. १८५६च्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी त्याला डावलून जेम्स ब्यूकॅनन याचे नामांकन पुढे केले.
बाह्य दुवे [संपादन]
- व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय. (इंग्लिश मजकूर)
- फ्रँकलिन पियर्स: अ रिसोर्स गाइड (फ्रँकलिन पियर्स: संसाधनांची मार्गदर्शिका). लायब्ररी ऑफ काँग्रेस. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||