जॉर्ज वॉशिंग्टन
| जॉर्ज वॉशिंग्टन | |
|
|
|
| कार्यकाळ ३० एप्रिल १७८९ – ४ मार्च १७९७ |
|
| मागील | पदनिर्मिती |
|---|---|
| पुढील | जॉन अॅडम्स |
|
|
|
| जन्म | २२ फेब्रुवारी, १७३२ व्हर्जिनिया, ब्रिटिश अमेरिका |
| मृत्यू | १४ डिसेंबर, १७९९ (वय ६७) व्हर्जिनिया, अमेरिका |
| सही | |
जॉर्ज वॉशिंग्टन (इंग्लिश: George Washington) (२२ फेब्रुवारी, इ.स. १७३२ - १४ डिसेंबर, इ.स. १७९९) हा इ.स. १७८९ ते इ.स. १७९७ या काळात अधिकारारूढ असलेला अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. इ.स. १७७५ ते इ.स. १७८३ या कालखंडात घडलेल्या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात त्याने खंडीय सैन्याचे नेतृत्व केले. इ.स. १७८७ साली नवस्वतंत्र संस्थानांच्या राष्ट्रासाठी राज्यघटना लिहिणाऱ्या मंडळाचे अध्यक्षपद त्याने सांभाळले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला अध्यक्ष म्हणून इ.स. १७८९ साली त्याची एकमुखाने निवड झाली. शासनाची कार्यकारी यंत्रणा कॅबिनेट स्वरूपाची असणे, अध्यक्षाचे अभिभाषण इत्यादी पायंडे व रीती घालून देऊन त्याने अमेरिकेच्या राज्यव्यवस्थेचा पाया घालण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेची संयुक्त संस्थानांनी युरोपातील राजकीय संघर्षाबाबत अलिप्त भूमिका राखत वित्तीय स्थिती सुदृढ असलेल्या शासनव्यवस्थेची बांधणी, स्थानिक बंडाळ्यांचा बिमोड करून सुव्यवस्था राखण्यावर भर दिला. या काळात अमेरिकेच्या राजकीय पटलावर भिन्न मतप्रणाल्यांच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे उदय होऊन बहुपक्षीय राजकारणाची व्यवस्था आकारास आली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात व तत्पश्चात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या जडणघडणीवर त्याच्या कार्याचा मोठा प्रभाव असल्याने, त्याला अमेरिकेचा राष्ट्रपिता असेही मानले जाते.
बाह्य दुवे [संपादन]
- प्रोजेक्ट गुटेनबर्ग - जॉर्ज वॉशिंग्टन याच्या साहित्यकृती (इंग्लिश मजकूर)
- लायब्ररी ऑफ काँग्रेस संकेतस्थळ - जॉर्ज वॉशिंग्टन याची सैन्यप्रमुख पदावरील नियुक्तीचे दस्तऐवज (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||