महायान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
महायान ही बौद्ध धर्माच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे (दुसरी मुख्य शाखा: थेरवाद). महायान पंथाची स्थापना भारतात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये पसरला.
आजच्या घडीला महायान पंथाचे लोक चीन, जपान, कोरिया, व्हियेतनाम व मंगोलिया ह्या देशांमध्ये आढळतात.