धम्म
बौद्ध धर्मानुसार धम्म (पाळि: धम्म ; संस्कृत: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा अनुभव[१] होय.
अनुक्रमणिका |
[संपादन] व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद
धम्म हा पाळि भाषेतील शब्द धर्म या "योग्य व न्याय्य मार्ग" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे[२].
पूर्व आशियात धम्म या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा मँडरिन भाषेत फा, जपानी भाषेत हो व कोरियन भाषेत बेओप असा उच्चार होतो. तिबेटी भाषेत या संज्ञेसाठी चोस असा शब्द आहे. उय्गूर, मंगोलियन व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये धम्म या संज्ञेस नोम हा शब्द असून, तो प्राचीन ग्रीक भाषेतील नोमोस (ग्रीक: νόμος) या "कायदा" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.
[संपादन] चार आर्यसत्य
दुःख आहे, दुःखाची उत्पत्ति आहे, दुःखातून मुक्ती आहे आणि मुक्तीगामी आर्य आष्टांगिक मार्ग हि चार आर्यसत्ये म्हणून ओळखली जातात.[३]
[संपादन] आष्टांगिक मार्ग
प्रज्ञा १) सम्यक दृष्टी २) सम्यक संकल्प
शील ३) सम्यक वाचा ४) सम्यक कर्मांत ५) सम्यक आजीविका
समाधी ६) सम्यक व्यायाम ७) सम्यक स्मृती ८) सम्यक समाधी[४]
[संपादन] धम्म परिषद
[संपादन] बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टीकोण
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे ‘ धम्म ’ . ‘ धम्म ’ या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं.[ संदर्भ हवा ] बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणाऱ्या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला[ संदर्भ हवा ]. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ‘ धम्म ’ असं आहे[ संदर्भ हवा ].
भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय" हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला आहे[ संदर्भ हवा ]. याचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे[ संदर्भ हवा ]. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती[ संदर्भ हवा ].
[संपादन] संदर्भ
- ↑ पाली ग्लोसरी संकेतस्थळ. ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ ; रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटे रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
- ↑ टर्नर,राल्फ (इ.स. १९३९). अ कंपॅरेटिव्ह अँड इटायमोलॉजिकल डिक्शनरी ऑफ द इंडो-आर्यन लॅग्वेजेस (इंडो-आर्यन भाषांचा तौलनिक व व्युत्पत्तिशास्त्रीय शब्दकोश) ग्रंथातील नोंद क्रमांक ६७५३. (इंग्लिश मजकूर)
- ↑ http://www.mahanayakonline.com/brandnews.aspx?bid=903
- ↑ http://www.maayboli.com/node/28927
[संपादन] अधिक वाचन
- धम्माची थेरवादातील व्याख्या. नॅशनल तायवान युनिवर्सिटी (तायवान राष्ट्रीय विद्यापीठ). (इंग्रजी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |