वज्रयान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वज्रयान (मंगोलियन: Очирт хөлгөн, Ochirt Hölgön, चिनी: 密宗, mì zōng) ही बौद्धमताची अनेक शतकांदरम्यान उत्क्रांत झालेली व्यामिश्र आणि बहुमुखी व्यवस्था आहे. ही तांत्रिक बौद्धमत, तंत्रयान, मंत्रयान, गुप्त मंत्र, गोपनीय बौद्धमत आणि हिरा मार्ग या नावांनीही ओळखली जाते.

वज्रयान धर्मसाहित्यानुसार बोधीच्या तीन मार्गांपैकी वज्रयान हा एक आहे. थेरवादमहायान हे इतर दोन मार्ग होत. वज्रयानाची स्थापना भारतीय महासिद्धांनी केली असून वज्रयानात बौद्ध तांत्रिक साहित्य प्रमाण मानले जाते.