दलाई लामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दलाई लामा म्हणजे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते होत. चौदावे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो सध्याचे दलाई लामा आहेत. चीन ने तिबेट हा देश ताब्यात घेतांना विरोध केल्याने यांनी हिमाचल प्रदेश या राज्यात धरमशाला येथे आश्रय घेतला आहे.

इतिहास[संपादन]

तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरु झाली. ‘दलाई’ म्हणजे ज्ञानाचा सागर व ‘लामा’ म्हणजे तिबेटीयन बुद्धिष्ट गुरु किंवा शिक्षक. पहिले लामा जेनडून द्रूप हे विहाराचे उच्च लामा झाले. ‘ड्रेपुंग’ हा तिबेटमधील सर्वात भव्य विहार आहे. पहिल्या लामांनंतर प्रत्येक नवा दलाई लामा हा पूर्वीच्या लामाचा अवतार मानला जाऊ लागला. आजच्या घडीला दलाई लामा हे तिबेटीय लोकांचे सर्वोच्च धार्मिक नेते व शासन प्रमुख देखील आहेत. इ.स. १३९१ ते इ.स. १९३३ या कालखंडात तेरा दलाई लामा होऊन गेले. तिबेटीय परंपरेनुसार ज्येष्ठ धर्मगुरु व शासन मिळून नवीन दलाई लामा निवडीची जबाबदारी पार पाडतात.

अधिक माहिती[संपादन]

दलाई लामा तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते होत. सध्याचे दलाई लामा आहेत. चौदावे दलाई लामा तेंझिन गियात्सो चीन ने तिबेट हा देश ताब्यात घेतांना विरोध केल्याने यांनी हिमाचल प्रदेश या राज्यात धरमशाला येथे आश्रय घेतला आहे. तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरु झाली. ‘दलाई’ म्हणजे ज्ञानाचा सागर व ‘लामा’ म्हणजे तिबेटीयन बुद्धिष्ट गुरु किंवा शिक्षक. पहिले लामा जेनडून द्रूप हे विहाराचे उच्च लामा झाले. ‘ड्रेपुंग’ हा तिबेटमधील सर्वात भव्य विहार आहे. पहिल्या लामांनंतर प्रत्येक नवा दलाई लामा हा पूर्वीच्या लामाचा अवतार मानला जाऊ लागला. आजच्या घडीला दलाई लामा हे तिबेटीय लोकांचे सर्वोच्च धार्मिक नेते व शासन प्रमुख देखील आहेत. इ.स. १३९१ ते इ.स. १९३३ या कालखंडात तेरा दलाई लामा होऊन गेले. तिबेटीय परंपरेनुसार ज्येष्ठ धर्मगुरु व शासन मिळून नवीन दलाई लामा निवडीची जबाबदारी पार पाडतात.

बाह्य दुवे[संपादन]

चीनचा नवा खोडसाळपणा