जस्टिन हेनिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जस्टिन हेनिन
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
वास्तव्य ब्रसेल्स
जन्म १ जून, १९८२ (1982-06-01) (वय: ४१)
लीज
उंची १.६७ मी (५ फु + इं)
सुरुवात १ जानेवारी १९९९
निवृत्ती २६ जानेवारी २०११
शैली उजवी
बक्षिस मिळकत $ २,०८,६३,३३५
एकेरी
प्रदर्शन ५२५ - ११५
अजिंक्यपदे ४३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (२० ऑक्टोबर २००३)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००४)
फ्रेंच ओपन विजयी (२००३, २००५, २००६, २००७)
विंबल्डन अंतिम फेरी (२००१, २००७)
यू.एस. ओपन विजयी (२००३, २००७)
इतर स्पर्धा
दुहेरी
प्रदर्शन ४७ - ३५
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
शेवटचा बदल: सप्टेंबर २६, इ.स. २०११.


पदक माहिती
बेल्जियमबेल्जियम या देशासाठी खेळतांंना
टेनिस
ऑलिंपिक खेळ
सुवर्ण २००४ अथेन्स महिला एकेरी

जस्टिन हेनिन (फ्रेंच: Justine Henin; २००१-२००५ दरम्यानचे नावः जस्टिन हेनिन-हार्देन) ही बेल्जियम देशाची एक माजी टेनिसपटू आहे. हेनिनने आपल्या कारकिर्दीत सात ग्रॅंडस्लॅम व एकूण ४३ महिला एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या. तसेच तिने २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक मिळवले. हेनिन डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये एकूण ११७ आठवडे अव्वल क्रमांकावर होती.

आपल्या मानसिक व शारिरिक क्षमता, चपळाई व खेळामधील वैविध्यामुळे हेनिन आजवरच्या सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक मानली जाते. तिचा एकहाती बॅकहॅंड महिला व पुरुष टेनिसमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे मत जॉन मॅकएन्रोने व्यक्त केले आहे तर आपल्या पिढीमधील सर्वात प्रतिभाशाली टेनिस खेळाडू ह्या शब्दांत बिली जीन किंग, आंद्रे अगासीमार्टिना नवरातिलोव्हा ह्या माजी टेनिस खेळाडूंनी हेनिनचे कौतुक केले आहे. आपल्या यशासाठी हेनिनचा २००७ साली बेल्जियममधील सर्वोत्कृष्ट खेळाडू तर २००८ साली लॉरियस वार्षिक महिला क्रीडापटू हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कारकीर्द[संपादन]

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेती २००१ विंबल्डन गवताळ अमेरिका व्हिनस विल्यम्स 6–1, 3–6, 6–0
विजेती २००३ फ्रेंच ओपन (1) माती बेल्जियम किम क्लाइजस्टर्स 6–0, 6–4
विजेती २००३ युएस ओपन (1) हार्ड बेल्जियम किम क्लाइजस्टर्स 7–5, 6–1
विजेती २००४ ऑस्ट्रेलियन ओपन (1) हार्ड बेल्जियम किम क्लाइजस्टर्स 6–3, 4–6, 6–3
विजेती २००५ फ्रेंच ओपन (2) माती फ्रान्स मेरी पीयर्स 6–1, 6–1
उप-विजेती २००६ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड फ्रान्स अमेली मॉरेस्मो 6–1, 2–0 निवृत्त
विजेती २००६ फ्रेंच ओपन (3) माती रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा 6–4, 6–4
उप-विजेती २००६ विंबल्डन गवताळ फ्रान्स आमेली मॉरेस्मो 2–6, 6–3, 6–4
उप-विजेती २००६ युएस ओपन हार्ड रशिया मारिया शारापोव्हा 6–4, 6–4
विजेती २००७ फ्रेंच ओपन (4) माती सर्बिया आना इवानोविच 6–1, 6–2
विजेती २००७ युएस ओपन (2) हार्ड रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा 6–1, 6–3
उप-विजेती २०१० ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड अमेरिका सेरेना विल्यम्स 6–4, 3–6, 6–2

बाह्य दुवे[संपादन]

मागील
बेल्जियम किम क्लाइजस्टर्स
बेल्जियम किम क्लाइजस्टर्स
फ्रान्स आमेली मॉरेस्मो
रशिया मारिया शारापोव्हा
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
२० ऑक्टोबर २००३ – २६ ऑक्टोबर २००३
१० नोव्हेंबर २००३ – १२ सप्टेंबर २००४
१३ नोव्हेंबर २००६ – २२ जानेवारी २००७
१९ मार्च २००७ – १९ मे २००८
पुढील
बेल्जियम किम क्लाइजस्टर्स
फ्रान्स अमेली मॉरेस्मो
रशिया मारिया शारापोव्हा
रशिया मारिया शारापोव्हा