नोव्हाक जोकोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोव्हाक जोकोविच
Новак Ђоковић (सर्बियन)
Novak Djokovic Hopman Cup 2011 (cropped).jpg
२०११ ची ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकल्यानंतर
उपाख्य नोल, जोकर
देश सर्बिया ध्वज सर्बिया
वास्तव्य मोनॅको
जन्म दिनांक मे २२, इ.स. १९८७ (1987-05-22) (वय  २५)
जन्म स्थळ बेलग्रेड, सर्बिया (तत्कालीन युगोस्लाव्हिया)
उंची १.८८ मी (६)
व्यावसायिक इ.स. २००३
खेळ उजव्या हाताने; बॅकहँड दोन्ही हातांनी
मिळकत ३५.३४ दशलक्ष अमेरिकन डॉलर
एकेरी
कारकीर्द: ४०८ – ११२
विजय २९
सर्वोच्च श्रेणी पहिला (४ जुलै, इ.स. २०११)
ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (इ.स. २००८, इ.स. २०११, इ.स. २०१२)
फ्रेंच ओपन उपांत्यफेरी (इ.स. २००७, इ.स. २००८, इ.स. २०११)
विंबल्डन विजयी (इ.स. २०११)
यू.एस. ओपन विजयी (इ.स. २०११)
इतर स्पर्धा
दुहेरी
कारकीर्द: ३१ - ४४
विजय
सर्वोच्च श्रेणी ११४ (३० नोव्हेंबर, इ.स. २००९)

शेवटचा बदल: मार्च १६, इ.स. २०१२.

ऑलिंपिक पदक माहिती
सर्बिया सर्बिया साठी खेळतांना
टेनिस - पुरुष
कास्य २००८ बीजिंग एकेरी

नोव्हाक जोकोविच (सर्बियन: Новак Ђоковић, Novak Đoković;) (२२ मे, इ.स. १९८७; बेलग्रेड, युगोस्लाव्हिया - हयात) हा एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोव्हाक सध्या प्रथम क्रमांकावर आहे. नोलजोकर ह्या टोपणनावांनी ओळखला जाणाऱ्या नोव्हाकने २००८, २०११ व २०१२ साली ऑस्ट्रेलियन ओपन, २०११ साली विंबल्डन व २०११ साली यू.एस. ओपन ह्या चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिसपटू आहे. तसेच २०१० साली सर्बियाला डेव्हिस करंडक जिंकून देणार्‍या संघामध्ये जोकोविच होता.

२०११ हे वर्ष जोकोविचसाठी सर्वात यशस्वी ठरले आहे. त्याने २०११ सालामध्ये ७० एकेरी सामने जिंकले व केवळ ६ सामन्यांत तो पराभूत झाला. त्याच्या ह्या यशाची तुलना जॉन मॅकएन्रोच्या १९८४ सालामधील घोडदौडीसोबत केली जाते. २०११ मध्ये त्याने ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एका वर्षात तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील केवळ सहावा पुरुष टेनिसपटू आहे. त्याचबरोबर त्याने २०११ मध्ये विक्रमी ५ ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा देखील जिंकल्या. ह्या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिसपटू (सध्याचा क्र. २) रफायेल नदालला सलग ६ अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. २०१२ साली जोकोविचने आपली घोडदौड कायम ठेवली असून वर्षामधील ऑस्ट्रेलियन ओपन ह्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील अटीतटीच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा रफायेल नदालचे आव्हान परतवले.

सर्बिया, बाल्कन तसेच भूतपूर्व युगोस्लाव्हियाच्या देशांमधील तो सर्वोत्कृष्ट टेनिसपटू मानला जातो. जोकोविचला आजवर अनेक सर्बियन राष्ट्रीय पुरस्कार व बहुमान मिळाले आहेत. पीट सॅम्प्रास ह्या माजी अव्वल टेनिसपटूने आजवर पाहिलेला सर्वोत्तम टेनिस खेळाडू असे जोकोविचचे वर्णन केले आहे.

जोकोविच आपल्या तडाखेबाज खेळासोबत खेळकर स्वभावासाठी देखील लोकप्रिय आहे. इतर टेनिसपटूंच्या नकला करणे तसेच सामन्यादरम्यान तसेच सामना संपल्यानंतर टिवल्याबावल्या करणे इत्यादी विनोदी उद्योगात तो पारंगत आहे.


अनुक्रमणिका

[संपादन] जीवन

[संपादन] कारकीर्द

[संपादन] ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेर्‍या: ७ (५ - २)

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेता २००७ यू.एस. ओपन हार्ड कोर्ट स्वित्झर्लंड रॉजर फेडरर ६–७(४–७), ६–७(२–७), ४–६
विजेता २००८ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड कोर्ट फ्रान्स जो-विल्फ्रेद साँगा ४–६, ६–४, ६–३, ७–६(७–२)
उप-विजेता २०१० यू.एस. ओपन (२) हार्ड कोर्ट स्पेन रफायेल नदाल ४–६, ७–५, ४–६, २–६
विजेता २०११ ऑस्ट्रेलियन ओपन (२) हार्ड कोर्ट युनायटेड किंग्डम अँडी मरे ६–४, ६–२, ६–३
विजेता २०११ विंबल्डन गवताळ कोर्ट स्पेन रफायेल नदाल ६–४, ६–१, १–६, ६–३
विजेता २०११ यू.एस. ओपन हार्ड कोर्ट स्पेन रफायेल नदाल ६–२, ६–४, ६–७(३–७), ६–१
विजेता २०१२ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड कोर्ट स्पेन रफायेल नदाल ५-७, ६-४, ६-२, ६-७५-७, ७-५

[संपादन] मास्टर्स १००० एकेरी अंतिम फेर्‍या: १७ (१० - ७)

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेता २००७ इंडियन वेल्स हार्ड कोर्ट स्पेन रफायेल नदाल २–६, ५–७
विजेता २००७ मायामी हार्ड कोर्ट आर्जेन्टिना ग्वियेर्मो कॅन्यास ६–३, ६–२, ६–४
विजेता २००७ रॉजर्स कप हार्ड कोर्ट स्वित्झर्लंड रॉजर फेडरर ७–६(७–२), २–६, ७–६(७–२)
विजेता २००८ इंडियन वेल्स हार्ड कोर्ट अमेरिका मार्डी फिश ६–२, ५–७, ६–३
विजेता २००८ रोम माती स्वित्झर्लंड स्टॅनिस्लास वावरिंका ४–६, ६–३, ६–३
उप-विजेता २००८ सिनसिनाटी हार्ड कोर्ट युनायटेड किंग्डम अँडी मरे ६–७(४–७), ६–७(५–७)
उप-विजेता २००९ मायामी हार्ड कोर्ट युनायटेड किंग्डम अँडी मरे २–६, ५–७
उप-विजेता २००९ मोंटे कार्लो माती स्पेन रफायेल नदाल ३–६, ६–२, १–६
उप-विजेता २००९ रोम माती स्पेन रफायेल नदाल ६–७(२–७), २–६
उप-विजेता २००९ सिनसिनाटी (२) हार्ड कोर्ट स्वित्झर्लंड रॉजर फेडरर १–६, ५–७
विजेता २००९ पॅरिस हार्ड कोर्ट फ्रान्स गायेल मॉनफिस ६–२, ५–७, ७–६(७–३)
विजेता २०११ इंडियन वेल्स (२) हार्ड कोर्ट स्पेन रफायेल नदाल ४–६, ६–३, ६–२
विजेता २०११ मायामी (२) हार्ड कोर्ट स्पेन रफायेल नदाल ४–६, ६–३, ७–६(७–४)
विजेता २०११ माद्रिद माती स्पेन रफायेल नदाल ७–५, ६–४
विजेता २०११ रोम (२) माती स्पेन रफायेल नदाल ६–४, ६–४
विजेता २०११ रॉजर्स कप(२) हार्ड कोर्ट अमेरिका मार्डी फिश ६–२, ३–६, ६–४
उप-विजेता २०११ सिनसिनाटी(३) हार्ड कोर्ट युनायटेड किंग्डम अँडी मरे ४–६, ०–३ ret.

[संपादन] ऑलिंपिक पदके (१ कांस्य)

निकाल क्र. तारीख स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
कांस्य १. १६ ऑगस्ट २००८ चीन बीजिंग ऑलिंपिक हार्ड कोर्ट अमेरिका जेम्स ब्लेक ६–३, ७–६(७–४)

[संपादन] बाह्य दुवे


मागील
स्पेन रफायेल नदाल
एटीपी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक
४ जुलै २०११ – चालू
पुढील
विद्यमान


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये