द्रुतगती मार्ग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वाहनांना कोणताही अडथळा न येता वेगाने जाता यावे यासाठी द्रुतगती मार्ग बांधले जातात. अशा मार्गांची सुरुवात अमेरिका येथे झाली. (संदर्भ?) मात्र जर्मनी येथील ऑटोबान हे जगात सर्वात वेगवान मानले जातात.[ संदर्भ हवा ] नवीन खाजगीकरणाच्या जागतिक लाटेमध्ये द्रुतगतीमार्गांच्या बांधणीचेही खाजगीकरण झाले आहे. हे खाजगी कंपन्यांनी बांधलेले रस्ते वापरण्यासाठी कर भरावा लागतो त्यास टोल असे संबोधले जाते. त्यामुळे यां या मार्गांना 'टोल वे' असेही नाव आहे. भारतातही सुवर्ण चतुष्कोन या नावाने भारताची सर्व महत्वाची शहरे जोडणारा द्रुतगती मार्गांचा प्रकल्प पुर्ण होतो आहे. प्रगत देशात द्रुतगतीमार्गांचे प्रदुषणाचे तोटेही आता समोर येत आहेत.