"सुर्यफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Drei Sonnenblumen im Feld.JPG|thumb|Drei Sonnenblumen im Feld]]
[[File:Sunflower macro wide.jpg|thumb|Sunflower macro wide]]
[[File:Sunflower macro wide.jpg|thumb|Sunflower macro wide]]
'''सुर्यफूल''' हे ॲस्टरासॅइ कुळातील वनस्पतीच्या ७० प्रजाती आहेत.
'''सुर्यफूल''' हे ॲस्टरासॅइ कुळातील वनस्पतीच्या ७० प्रजाती आहेत.

१२:०६, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती

Drei Sonnenblumen im Feld
Sunflower macro wide

सुर्यफूल हे ॲस्टरासॅइ कुळातील वनस्पतीच्या ७० प्रजाती आहेत.

यातील अनेक प्रजातींच्या बीयांतून खाद्यतेल काढले जाते. खाद्यतेलाचे मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण खाद्यतेलात स्निग्ध हा महत्त्वाचा घटक असतो.शास्त्रज्ञांच्या मते मानवी आहारात प्रतिदिन ४० ग्रॅम खाद्यतेलाची आवश्यकता असते.बाजारातील खाद्यतेलाचे वाढलेले भाव लक्षात घेता रब्बी मध्ये तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी सुर्यफूल लागवडीस अनन्य साधारण महत्त्व देण्यात येते. सुर्यफुल हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तेलबिया पीक असून भारतात एकूण तेलबियांपैकी २८ % क्षेत्र व १० % उत्पादन सुर्यफुलापासून होते. महाराष्ट्रात विविध तेलबिया पिकांची लागवड केली जाते. प्रामुख्याने मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती व इतर काही जिल्ह्यात सुर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्याच्या एकूण सुर्यफूल क्षेत्रापैकी ७० % क्षेत्र मराठवाड्यात आहे. सुर्यफुल हे गळीताचे नवीन पीक असून राज्यात या पिकाखालील सन २००२ - २००३ वर्षी एकूण २.८९ लाख हेक्टर क्षेत्र व उप्तादन १.४३ लाख टन आहे. सरासरी उत्पादकता ४९४ किलो/ हेक्टरी आहे.

हवामान

सुर्यफुल हे पीक विविध हवामानात चांगले येते.सुर्यफुलाचे पीक महाराष्ट्रात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते. रब्बी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगामापेक्षा, सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला असतो.कारण रब्बी हंगामातील वातावरणामुळे सुर्यफुलाच्या वाढीसाठी भरपूर कालावधी मिळतो.पीक काढणीस जास्त कालावधी लागतो.याउलट खरीप उन्हाळी हंगामात अधिक तापमानामुळे पीक लवकर काढणीस तयार होते. त्यामुळे उत्पादनात फरक पडतो. २० डी. ते २२ डी.सें.ग्रे. तापमान सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी पोषक असते.

जमीन

सुर्यफुलाच्या वाढीसाठी वाळूमिश्रीत जमीन अधिक चांगली असते परंतु सुर्यफूल पीक सर्व प्रकारच्या निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले येते. सुर्यफुलाच्या मुळाच्या वाढीसाठी निचरा होणारी जमीन आवश्यक असते. निचरा होणाऱ्या जमिनीत अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होऊन पिकाची वाढ जोरात होते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ असल्यास सुर्यफुल चांगले होते.

बीजप्रक्रिया

पेरणीकरीता चांगले, टपोरे बी हवे असतात व बारीक,बी बाजूला काढले जातात.. १ किलो बियाणे २५ ते ३० मिली जर्मिनेटर आणि १ लि. पाण्याच्या द्रावणात ५ ते ६ तास भिजवून सावलीत वळवले जातात. त्यामुळे उगवण लवकर, एकसारखी आणि चांगली होते.

पुर्वमशागत

सुर्यफुलाच्या मुळ्या जमिनीत ६० सेंमी खोलवर जात असल्यामुळे १५ ते २० सेमी खोलवर नांगरट करावी लागते. कुळवाच्या २ - ३ पाळ्या देऊन ढेकळे फोडावी व शेत सपाट करून घ्यावी लागते.जमिनीचा पोत व सुपिकता सुधारण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत प्रतीएकरी ४ - ५ गाड्या आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० किलो जमिनीत पसरावे. पसरल्यानंतर पाळ्या देऊन शेत सपाट करून घ्यावी.


संदर्भ

[१]

  1. ^ http://www.drbawasakartechnology.com/m-July2011-SunflowerLagwad.html#.Wuai5XucHIU