"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 134 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1568
छो removing incorrect link
ओळ २७: ओळ २७:


[[bar:Hoamseitn]]
[[bar:Hoamseitn]]

[[bug:Mappadecéŋ]]
[[ee:Axa do Ŋgɔ]]
[[ee:Axa do Ŋgɔ]]
[[lmo:Pagina principala]]
[[lmo:Pagina principala]]

००:३२, २२ जून २०१३ ची आवृत्ती

हिंदी भाषा

हिंदी भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या २२ भाषांपैकी एक आहे. ती इंग्रजीबरोबरच भारत सरकारच्या कामकाजाची भाषा आहे. हिंदीला अनेकदा राष्ट्रभाषा म्हणून संबोधले जाते. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. हिंदी झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड व दिल्ली, या राज्यांची राजभाषा आहे. पाकिस्तान, बांग्ला देश, अफगाणिस्तान, श्री लंका, मध्यपूर्वेतील देश व उर्वरित भारतात हिंदी अनेकांना समजते आणि तिकडचे लोक त्या भाषेत जरुरीपुरते बोलू शकतात.

  • जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.
  • भारतातील सर्वात जास्त खप आणि आवृत्त्या असलेली वर्तमानपत्रे हिंदी भाषेत प्रसिद्ध होतात.
  • हिंदी चित्रपट भारतातच नाही तर जगभर पाहिले जातात.
  • हिंदी चित्रपटसंगीत सर्वत्र लोकप्रिय आहे.
  • चिनी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
  • आंतरजालावर वापरलेल्या भाषांतल्या पहिल्या दहात हिंदी आहे.
  • जिच्यातले अधिकाधिक साहित्य अन्य जागतिक भाषांत अनुवादित होते अशा पहिल्या विसात हिंदी आहे.
  • भारतात अन्य भाषांत हिंदीतल्या अनेक शब्दांचा शिरकाव झाला आहे आणि त्या भाषांच्या व्याकरणावर हिंदीचा प्रभाव जाणवू लागला आहे.

भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे.[१] जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.[२] [३]