"कॅलिफोर्निया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: eml:Califòrgna
छो r2.7.2) (Robot: Modifying fa:کالیفرنیا to fa:ایالت کالیفرنیا
ओळ १६३: ओळ १६३:
[[et:California]]
[[et:California]]
[[eu:Kalifornia]]
[[eu:Kalifornia]]
[[fa:کالیفرنیا]]
[[fa:ایالت کالیفرنیا]]
[[fi:Kalifornia]]
[[fi:Kalifornia]]
[[fo:Kalifornia]]
[[fo:Kalifornia]]

२१:१८, २० फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

कॅलिफोर्निया
California
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द गोल्डन स्टेट (The Golden State)
ब्रीदवाक्य: Eureka
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी साक्रामेंटो
मोठे शहर लॉस एंजेल्स
क्षेत्रफळ  अमेरिकेत ३वा क्रमांक
 - एकूण ४,२३,९७० किमी² 
  - रुंदी ४०० किमी 
  - लांबी १,२४० किमी 
 - % पाणी ४.७
लोकसंख्या  अमेरिकेत १वा क्रमांक
 - एकूण ३,७२,५३,९५६ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ९०.५/किमी² (अमेरिकेत ११वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $६१,०२१
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ९ सप्टेंबर १८५० (३१वा क्रमांक)
संक्षेप   US-CA
संकेतस्थळ ca.gov

कॅलिफोर्निया (इंग्लिश: California) हे अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक राज्य आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे राज्य आकाराने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे (अलास्काटेक्सास खालोखाल). अमेरिकेच्या ५० सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी ८ शहरे कॅलिफोर्निया राज्यात स्थित आहेत.

कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, दक्षिणेला मेक्सिकोचे बाहा कॅलिफोर्निया हे राज्य, उत्तरेला ओरेगॉन तर पूर्वेला नेव्हाडाअ‍ॅरिझोना ही राज्ये आहेत. साक्रामेंटो ही कॅलिफोर्नियाची राजधानी असून लॉस एंजेल्स हे सर्वात मोठे शहर व महानगर आहे.

१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८ दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ९ सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणींचा शोध लागला व अमेरिकेच्या इतर भागातून व सर्व जगभरातून स्थलांतर करणार्‍या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले. लॉस एंजेल्स येथील हॉलिवूड ह्या सिनेउद्योगामुळे, येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने बेट देणार्‍या पर्यटकांमुळे व सिलिकॉन व्हॅलीमधील अतिविकसित तंत्रज्ञान उद्योगांमुळे कॅलिफोर्नियाची भरभराट झाली आहे. आजच्या घडीला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलणाऱ्या कॅलिफोर्नियाचा जीडीपी $१.८१२ सहस्त्रअब्ज इतका आहे.

मोठी शहरे

खालील १० शहरे कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठी शहरे आहेत.

क्रम शहर लोकसंख्या चित्र वर्णन
लॉस एंजेल्स ३७,९२,६२१ अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे व देशाच्या अर्थकारणामधील आघाडीचे शहर. हॉलिवूड येथील सिनेउद्योग जगातील सर्वात मोठा आहे.
सान डियेगो १३,०७,४०२ हे शहर अमेरिकेमधील सर्वात राहण्यायोग्य शहर मानले जाते.
सान होजे ९,४५,९४२ अमेरिकेतील दहाव्या क्रमांकाचे व सिलिकॉन व्हॅलीमधील प्रमुख शहर.
सॅन फ्रान्सिस्को ८,०५,२३५ एक आंतरराष्ट्रीय पर्यटनकेंद्र.
फ्रेस्नो ५,०२,३०३ कॅलिफोर्नियाच्या कृषीप्रधान भागातील एक मोठे शहर.
साक्रामेंटो ४,९०,४८८ उत्तर भागात वसलेले हे शहर कॅलिफोर्नियाची राजधानी आहे.
लाँग बीच ४,६२,२५७ लॉस एंजेल्सचे उपनगर असलेले हे शहर जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे.
ओकलंड ३,९०,७२४ सॅन फ्रान्सिस्को भागातील एक मोठे शहर
बेकर्सफील्ड ३,४७,४८३ कॅलिफोर्नियातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर.
१० अ‍ॅनाहाइम ३,३६,२६५ ऑरेंज काउंटीमधीला सर्वात मोठे शहर

गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: