देवयानी तारकासमूह
Appearance
हा लेख देवयानी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, देवयानी (निःसंदिग्धीकरण).
इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातल्या टॉलेमी या खगोलशास्त्रज्ञाने जे ४८ तारकासमूह नोंदवले आहेत त्यांतला देवयानी हा एक आहे. या तारकासमूहाचे देवयानी हे नाव हिंदू पुराणकथांतल्या शुक्राचार्यांच्या कन्येच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. इंग्रजीत देवयानीला Andromeda म्हणतात. हा इंग्रजी व्ही या अक्षराच्या आकाराचा हा तारकासमूह विश्वाच्या उत्तर गोलार्धात अगदी उत्तरेला शर्मिष्ठा आणि उत्तर त्रिकोण या तारकापुंजांच्या जवळपास आहे.
देवयानी तारकासमूहाच्या सीमेवर देवयानी दीर्घिका आहे.
पहा : चांदण्यांची नावे